रेशनधान्य देत नाही म्हणून दुकानदारच बदलून टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:47+5:302021-07-10T04:06:47+5:30

एकूण कार्डधारक - ११,५५,३३९ ६५,१९५ लोकांनी दुकानदार बदलला अंत्योदय - १,२१,९४९ प्राधान्यगट - ६,५४,७६६ केशरी - १,३७,८६० लोकमत न्यूज ...

The shopkeeper changed it as he does not give rations | रेशनधान्य देत नाही म्हणून दुकानदारच बदलून टाकला

रेशनधान्य देत नाही म्हणून दुकानदारच बदलून टाकला

Next

एकूण कार्डधारक - ११,५५,३३९

६५,१९५ लोकांनी दुकानदार बदलला

अंत्योदय - १,२१,९४९

प्राधान्यगट - ६,५४,७६६

केशरी - १,३७,८६०

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दुकानदार धान्य देत नाही म्हणून नागपूर जिल्ह्यातील तब्बल ६५,१९५ कार्डधारकांनी आपला रेशन दुकानदारच बदलून टाकला. यात शहरातील सर्वाधिक ५०,७३४ कार्डधारकांचा समावेश असून ग्रामीण भागातील १४,४६१ लोकांनी आपला रेशन दुकानदार बदलविला आहे.

रेशन दुकानदार धान्य व्यवस्थित देत नाही. कमी देतो, धान्य निकृष्ट दर्जाचे असते, अशा एक ना अनेक तक्रारी येत असतात. सरकारने या तक्रारींची गंभीर दखल घेत पोर्टेबिलिटीची सोय उपलब्ध करून दिली. एखादा दुकानदार धान्य व्यवस्थित देत नसेल तर रेशन कार्डधारकांना दुसऱ्या दुकानांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागपूरकरांनीही या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. नागपूर जिल्ह्यातील ६५,१९५ कार्डधारकांनी या पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे.

- शहरात जास्त बदल

- नागपूर जिल्ह्यात जून २०२१ पर्यंत एकूण ६५,१९५ जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला

- यात शहरातील सर्वाधिक ५०,७३४ तर ग्रामीणमधील १४,४६१ कार्ड धारकांनी दुकान बदलविले.

- शहर एकूण सहा झोनमध्ये विभागले आहे. यातही सर्वाधिक टेका झोनमधील १८,६६३ लोकांनी दुकानदार बदलविला. यानंतर इतवारी झोनमधील ९,५५९, मेडिकल झोनमध्ये ८,१९४, महाल झाेनमधील ७,२७८, सदर झोनमधील ४८६२ आणि धंतोली झोनमधील २१७८ लोकांनी आपला दुकानदार बदलविला.

- नोव्हेंबरपर्यंत मिळणार धान्य

- जिल्ह्यात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न याेजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.

- आतापर्यंत तब्बल १६ लाखावर लाेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यात शहरातील ९ लाख ९१ हजारावर तर ग्रामीण भागदातील ६ लाखावर लाोकांनी या योजनेाचा लाभ घेतला आहे.

कोणत्या तालुक्यात किती लोकांनी बदलला दुकानदार

भिवापूर - १८२

हिंगणा - १८६१

कळमेश्वर - ८७९

कामठी - ३८१३

काटोल - ३१३

कुही - ३१८

मौदा - ६४४

नाागपूर ग्रामीण - ३३१२

नरखेड - ३९३

पारशिवनी - ९२५

रामटेक - ६०७

सावनेर - ३३०

उमरेड - ७८४

----------------------

एकूण - १४,४६१

Web Title: The shopkeeper changed it as he does not give rations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.