कळमेश्वर, माराेडी येथील दुकानात चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:10 AM2021-09-22T04:10:27+5:302021-09-22T04:10:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर/माैदा : घरफाेडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चाेरट्यांनी कळमेश्वर शहरात व माैदा पाेलीस ठाण्याच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर/माैदा : घरफाेडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चाेरट्यांनी कळमेश्वर शहरात व माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माराेडी येथील किराणा दुकानांमध्ये चाेरी करीत चांदीचे नाणे, राेख रक्कम किराणा साहित्य, असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.
नितीन मनाेहर गेडाम (३३, रा. हुडकाे काॅलनी, कळमेश्वर) यांचे कळमेश्वर शहरात किराणा दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारात दुकानाजवळ कुणीही नसताना अज्ञात चाेरट्याने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. यात त्याने दुकानातील तीन हजार रुपये राेख, तीन हजार रुपयांचे सुटे नाणे, तसेच १४ हजार रुपये किमतीचे किराणा साहित्य चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच नितीन गेडाम यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली.
चाेरीची दुसरी घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोडी येथे घडली. रवींद्र गणपतराव सिंगनजुडे, रा. माराेडी, ता. माैदा यांचे माराेडी येथे किराणा दुकान आहे. चाेरट्याने मध्यरात्री परिसरात कुणीही नसताना दुकानाचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने पेटीतील १५ हजार रुपये राेख, एक हजार रुपये किमतीचे चांदीचे नाणे व केराेसिन विक्रीचा परवाना, असा एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
दुकानात चाेरी झाल्याचे निदर्शनास येताच रवींद्र सिंगनजुडे यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. या दाेन्ही प्रकरणांत कळमेश्वर व माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ४५७, ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनांचा पुढील तपास अनुक्रमे पाेलीस उपनिरीक्षक सावळा व हवालदार देशमुख करीत आहेत.