लाॅकडाऊन काळातही सुरू असतात दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:29+5:302021-05-15T04:08:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी, संचारबंदी साेबतच लाॅकडाऊनची घाेषणा केली. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी, संचारबंदी साेबतच लाॅकडाऊनची घाेषणा केली. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची विशिष्ट वेळ देण्यात आली. या काळात अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेल्या वस्तूंची दुकाने उघडण्यात आली असून, त्या दुकानांसमाेर ग्राहकांची गर्दी दिसून येते. दुकानदारांनी व ग्राहकांकडून हाेत असलेली ही उपाययाेजनांची पायमल्ली काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत आहे. परिणामी, कुही तालुक्यात काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत मार्च व एप्रिलमध्ये काेराेना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.
तालुक्यातील काेराेना रुग्णांची संख्या चार हजारावर गेली आहे. मार्च व एप्रिलमध्ये तालुक्यात राेज १२० ते १५० रुग्णांची नाेंद केली जायची. याच काळात प्रशासनाने काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा वेगही वाढविला. सध्या राेज चार ते पाच रुग्ण आढळून येत असून, मागील आठवड्यापासून तालुक्यातील काेराेना संक्रमण हळूहळू कमी हाेत असल्याचे दिसून येत आहे. संक्रमण राेखण्यासाठी कुही शहरासह तालुक्यातील किराणा, भाजीपाला, आटाचक्की व फळांची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ या काळात सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, काहींनी या नियमांची पायमल्ली करीत अत्यावश्यक सेवेत येत नसलेल्या साहित्याची दुकानेही या काळात सुरू केली.
या दुकानांसमाेर ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. उपाययाेजनांची केली जात असलेली पायमल्ली काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तवात, या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्या दुकानदारांना प्रशासनाने काेणतीही समज दिली नाही अथवा दंडात्मक कारवाई केली नाही. तालुक्यातील काेराेना संक्रमण कमी हाेत असताना नियमांची पायमल्ली केली जात असून, उपाययाेजनांचे पालन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.
......
तरुणांचा मृत्यू धक्कादायक काही रुग्णांना उपचाराचा अभाव, रुग्णालयातील खाटांची कमतरता तसेच वेळीच ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गमवावा लागला. तालुक्यात उपचाराची साेय नसल्याने रुग्णांना नागपूरला पाठविले जायचे. मृतांमध्ये ३५ ते ४० वर्षे वयाेगटातील तरुणांची संख्या अधिक असल्याने तसेच हे मृत्यू लागाेपाठ झाल्याने ते सर्वांसाठी धक्कायदाक हाेते. यात कुही शहरातील तिघांसह ग्रामीण भागातील काहींचा समावेश आहे.
...