राेडलगतची दुकाने बाजारात स्थानांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:47+5:302021-05-12T04:09:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरातील काेराेनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता शहराच्या मध्यभागातून गेलेल्या नागपूर-काटाेल मार्गालगत भाजीपाल्याची दुकाने थाटली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरातील काेराेनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता शहराच्या मध्यभागातून गेलेल्या नागपूर-काटाेल मार्गालगत भाजीपाल्याची दुकाने थाटली जायची. या दुकानांसमाेर ग्राहकांची गर्दी हाेत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन व्हायचे. ही बाब काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडणारी असल्याने पालिका प्रशासनाने ही दुकाने तातडीने हटवून भाजीपाला विक्रेत्यांना आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून दिली. ही कारवाई मंगळवारी (दि. ११) सकाळी करण्यात आली.
लाॅकडाऊनमध्ये दुकाने सुरू व बंद करण्याच्या वेळा ठरवण्यात आल्या असून, काही बंधनेही घालण्यात आली आहेत. त्यातच भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांची दुकाने नागपूर-काटाेल मार्गालगत नगरपरिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंतीजवळ थाटायला सुरुवात केली. हा मार्ग वर्दळीचा असून, या ठिकाणाहून गाेंडखैरीकडे जाणारा मार्ग सुरू असल्याने या टी पाॅईंट जवळील ही दुकाने धाेकादायक ठरत हाेती. शिवाय, ग्राहक त्या दुकानांसमाेर गर्दी करायचे तसेच त्यांची वाहनेही राेडलगत उभी करायचे.
दरम्यान, ही बाब अपघात व काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडणारी असल्याने यासंदर्भात लाेकमतमध्ये ‘रोड लगतच्या दुकानांचा रहदारीस अडसर’ या शीर्षकाखाली साेमवारी (दि. १०) वृत्त प्रकाशित केले. नगर पालिका प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत ही सर्व दुकाने शहरातील आठवडी बाजारात माेकळ्या जागेवर स्थानांतरित केली. तत्पूर्वी दुकानदारांना रीतसर नाेटीस बजावण्यात आल्या हाेत्या. सध्या या बाजारात विशिष्ट अंतरावर भाजीपाल्याची दुकाने थाटली जात असल्याने तसेच वाहने ठेवायला पुरेशी जागा असल्याने येथे भाजीपाला खरेदी करताना फारशी गर्दी हाेत नसल्याचेही प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. पालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.