होळीला आज दुपारी चारपर्यंत दुकाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:50+5:302021-03-28T04:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्बंध लावले असून, होळी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्बंध लावले असून, होळी व धुळवड व शब- ए-बारात उत्सवाबाबत विशेष आदेश काढले आहेत. धुळवडीसाठी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. सार्वजनिक होळी, धुळवड साजरी करण्याला बंदी घातली आहे. मिरवणूक काढण्याला बंदी आहे. धुळवडीच्या दिवशी स्टँड अलोन स्वरूपातील मटण, मासे, अंडी, भाजीपाला व किराणा दुकाने दुपारी १ पर्यंत सुरू राहतील, असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
....
आज दुपारी ४ पर्यंत दुकाने सुरू
होळीला रविवारी दुपारी ४ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहतील तसेच रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ७ पर्यंत होम डिलिव्हरीसाठी रात्री ११ पर्यंत किचन सुरू ठेवता येतील.
...
धुळवडीला पार्सल सुविधा
धुळवडीला सोमवारी हॉटेल्स, रेस्टारंट, उपहारगृहातील प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहतील. परंतु, पार्सल सुविधा सायंकाळी ७ पर्यत सुरू राहणार आहे.
..
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
- सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याला बंदी (शासकीय, निमशासकीय व आवश्यक सेवा कार्यालये वगळून)
- सार्वजनिक तसेच खासगी ठिकणी सार्वजनिकरत्यिा होळी, धूलिवंदन, शब-ए-बारात साजरी करण्याला मनाइं
- मिरवणूक काढण्याला मनाई
...
धूलिवंदन व अन्य उत्सवांना लावलेले निर्बंध
- खसगी आस्थपना, कार्यालये बंद राहतील.
-दुकाने, मार्केट बंद राहील.
-वाचनालय, अभ्यासिका बंद राहतील.
-रेस्टारंट, हॉटेल, खाद्यगृहातील डायनिंग सुविधा बंद, पार्सल सुविधा सायंकाळी ७ पर्यंत.
- स्टॅन्ड अलोन स्वरूपात भाजीपाला, किराणा, मटन, मास, अंडी दुकाने दुपारी १ पर्यंत सुरू राहतील