शाॅर्ट सर्किटमुळे धानाची गंजी जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:16+5:302020-12-17T04:36:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शेतातून गेलेल्या वीज वाहिनीत शाॅर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडून धानाच्या गंजीला आग लागली. यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शेतातून गेलेल्या वीज वाहिनीत शाॅर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडून धानाच्या गंजीला आग लागली. यात संपूर्ण २२ एकरातील धान जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे १० लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना रामटेक तालुक्यातील पंचाळा शिवारात शनिवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास घडली.
पंचाळा येथील ताराचंद ताकाेत यांची २२ एकर शेती असून, यावर्षी त्यांनी संपूर्ण शेतात धान राेवणी केली हाेती. धानाची कापणी करून शेतातच गंजी लावली हाेती. त्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी गेली आहे. दरम्यान शनिवारी रात्री वीज वाहिनीत शाॅर्ट सर्किट होऊन आगीची ठिणगी पडल्याने संपूर्ण धानाची गंजी खाक झाली. या गंजीतून त्यांना ५०० पाेती धान हाेण्याची शक्यता हाेती. आगीमुळे ताकाेद यांचे अंदाजे १० लाखाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती रामटेक पाेलिसांना देण्यात आली. ठाणेदार प्रमाेद मुक्केवार यांच्या मार्गदर्शनात पाेलीस नाईक निमेश पिपराेदे, दीपक यादव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आगीच्या या घटनेमुळे ताराचंद ताकाेत यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.