नागपुरात रेमडेसिवीरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:15 AM2020-09-25T11:15:25+5:302020-09-25T11:17:23+5:30

मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रभावी मानल्या जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा नागपुरात तुटवडा पडला आहे. परिणामी, काही ठिकाणी चढ्या दराने याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.

Shortage of Remedesivir in Nagpur | नागपुरात रेमडेसिवीरचा तुटवडा

नागपुरात रेमडेसिवीरचा तुटवडा

Next
ठळक मुद्देरुग्णांच्या नातेवाईकांची पायपीटजादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क 
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावला असला तरी रोज १२०० वर रुग्णांची नोंद होत आहे. मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रभावी मानल्या जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पडला आहे. परिणामी, काही ठिकाणी चढ्या दराने याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मागणी व पुरवठा यावर लक्ष ठेवून असतानाही काळाबाजार सुरू आहे. इन्जेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर पायपीट करण्याचीही वेळ आली आहे.

नागपूर जिल्ह्यात आता बहुसंख्य खासगी हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाली आहेत. येथे लक्षणे असलेल्या रुग्णांना प्राधान्य दिले जात आहे. यातील काहींना रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेरून विकत आणण्यास डॉक्टर सांगत आहेत. परंतु उत्पादनाच्या तुलनेत मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने सध्या बाजारात उपलब्ध नाही. लोकमतने काही औषध विक्रेत्यांशी बोलून मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु औषध नाही असेच उत्तर मिळाले.

-इंजेक्शन कुठेच मिळाले नाही
एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने लोकमतला सांगितले, रुग्णाची प्रकृती गंभीर होत आहे. यामुळे डॉक्टरांनी रेमडेसिवीर आणायला सांगितले. हॉस्पिटललगत औषधविक्रेत्यापासून ते गांधीबागपर्यंत पायपीट केली परंतु कुठेच मिळाले नाही. अनेक नातेवाईक माझ्यासारखे फिरत असल्याचेही त्यांनी सांगितले.


-मेयो, मेडिकलमध्येही तुटवडा
मेयो, मेडिकलमध्येही या इंजेक्शनचा तुटवडा पडला आहे. येथील एका डॉक्टरने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, पूर्वी एखादा रुग्ण गंभीर लक्षणाकडे जात असल्यास त्याला रेमडेसिवीर दिले जात होते. परंतु आता मोजकाच साठा असल्याने के वळ गंभीर रुग्णांनाच दिले जात आहे. एका रुग्णाला कमीतकमी सहा इंजेक्शनची गरज पडते. सध्या एका रुग्णालयातून रोज २५० इंजेक्शनची मागणी होत आहे. पुरवठादाराकडे मागणीचा प्रस्ताव पडून आहे.

-५४०० रुपयांचे इंजेक्शन सात हजाराच्या घरात
सुत्रानूसार, रेमडेसिवीरच्या एका कुपीची किंमत शासकीय रुग्णालयांसाठी ४,१४४ रुपये आहे, तर खासगी रुग्णालयांना ५,४०० रुपयांना मिळते. काही दुकानांमध्ये नातेवाईकांच्या संगनमताने बिलांवर मूळ किंमत दाखवून ती सात ते आठ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे.

-शासनाने जबाबदारी घ्यायला हवी
प्रशासनाने खासगी हॉस्पिटलवर दबाव आणून कोविड रुग्णांसाठी खाटा वाढवून घेतल्या. परंतु रुग्णांना लागणारे आॅक्सिजन, जीवनावश्यक औषधे जसे रेमडेसिवीर, टॉसीलिझूमॅब इंजेक्शनच्या तुटवड्याचे काय, हा प्रश्न आहे. प्रशासनाने यासाठी पुढे येऊन तातडीने जबाबदारी घ्यायला हवी. सध्याच्या स्थितीत या तिन्ही गोष्टींचा तुटवडा आहे.
-डॉ. अनुप मरार
समन्वयक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन


-पुरवठा व विक्रीकडे लक्ष
रेमडेसिवीरच्या पुरवठा व विक्रीकडे एफडीए लक्ष ठेवून आहे. परंतु सध्याच्या स्थितीत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे.
-पी.एम. बल्लाळ
सहआयुक्त, औषध प्रशासन

 

Web Title: Shortage of Remedesivir in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.