सावरगाव येथे ‘टेस्टिंग किट’चा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:41+5:302021-05-10T04:09:41+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : काेराेना टेस्ट करवून घेण्याचे प्रमाण वाढल्याने सावरगाव (ता. नरखेड) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नागरिक ...

Shortage of 'Testing Kit' at Savargaon | सावरगाव येथे ‘टेस्टिंग किट’चा तुटवडा

सावरगाव येथे ‘टेस्टिंग किट’चा तुटवडा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : काेराेना टेस्ट करवून घेण्याचे प्रमाण वाढल्याने सावरगाव (ता. नरखेड) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नागरिक राेज सकाळी ६ वाजतापासून रांगा लावायला सुरुवात करतात. मात्र, यातील पहिल्या ५० नागरिकांची टेस्ट केली जात असल्याने इतरांना नाईलाजास्तव परतीचा रस्ता धरावा लागताे. ‘टेस्टिंग किट’चा पुरेसा पुरवठा केला जात नसल्याने ही समस्या उद्भवल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणी स्थानिक व परिसरातील गावांमधील नागरिकांनी केली आहे.

सावरगाव व परिसरातील गावांमध्ये काेराेना संक्रमण वाढत चालले हाेते. त्यातच नागरिकांनी स्वत:हून काेराेनाच्या टेस्ट करायला सुरुवात केली. सावरगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात ॲंटिजन व आरटीपीसीआर टेस्टची साेय करण्यात आली आहे. या आराेग्य केंद्रात राेज केवळ ५० आटीपीसीआर टेस्ट किट उपलब्ध करून दिल्या जात असल्याने पहिल्या ५० नागरिकांची चाचणी केली जाते. त्यामुळे उर्वरित नागरिकांना विना टेस्ट परत जावे लागत बसून, दुसऱ्या दिवशी परत यावे लागते.

सावरगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात स्थानिक व परिसरातील गावांमधील नागरिक काेराेना चाचणीसाठी येतात. त्यामुळे आराेग्य केंद्राला राेज किमान २०० टेस्टिंग किट पुरवायला पाहिजे, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी खासगीत बाेलताना दिली. राेज केवळ ५० किट मिळत असल्याने आपला नाईलाज असल्याचेही त्यांनी सांगितले. वारंवार परत जावे लागत असल्याने नागरिक राेज सकाळी ६ वाजतापासून आराेग्य केंद्रात यायला सुरुवात हाेते. यातील काही जण जेवणाचे डबेही साेबत घेऊन येतात.

...

नागरिकांऐवजी चपलांची रांग

दुसऱ्या दिवशी नंबर लागावा म्हणून नागरिक सकाळी ६ वाजतापासून आराेग्य केंद्रात येतात. त्यामुळे या आराेग्य केंद्राच्या आवारात चाचणी करण्यासाठी येणाऱ्यांनी राेज माेठी गर्दी दिसून येते. मात्र, नागरिकांची रांग दिसून येत नाही. रांगेत उभे राहून संक्रमित हाेण्याची भीती असल्याने आपण रांगेत उभे न राहता केवळ चपला ठेवत असल्याची माहिती अनेकांना दिली. त्यामुळे या आराेग्य केंद्राच्या दारासमाेर माणसांऐवजी चपलांची रांग दिसून येते.

Web Title: Shortage of 'Testing Kit' at Savargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.