कळमेश्वर तालुक्यात ‘टेस्टिंग किट’चा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:08 AM2021-05-01T04:08:07+5:302021-05-01T04:08:07+5:30
आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरासह संपूर्ण तालुक्यात काेराेना संक्रमणाचा जाेर कायम आहे. मात्र, तालुक्यात काेराेना ‘टेस्टिंग ...
आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरासह संपूर्ण तालुक्यात काेराेना संक्रमणाचा जाेर कायम आहे. मात्र, तालुक्यात काेराेना ‘टेस्टिंग कीट’चा (रॅपिड ॲन्टिजेन) तुटवडा जाणवायला सुरुवात झाल्याने चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी हाेत असल्याचे दिसून येते. ही गर्दीदेखील काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात केवळ ३०० आरटी-पीसीआर टेस्ट केली जात असल्याची माहिती डाॅ. प्रीती इंगळे यांनी दिली.
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी आता स्वत:हून काेराेना टेस्ट करायला सुरुवात केली आहे. कळमेश्वर शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-२ व काेविड सेंटर या दाेन ठिकाणी काेराेना चाचणीची साेय करण्यात आली आहे. दाेन्ही ठिकाणी राेज ३०० ते ४०० नागरिक टेस्ट करण्यासाठी येतात. मात्र, रॅपिड ॲन्टिजेनसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘टेस्टिंग किट’ संपल्याने तसेच वेळीच पुरवठा केला जात नसल्याने येथे चाचणीसाठी येणाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.
...
राेज ३०० नागरिकांची आरटी-पीसीआर टेस्ट
कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील चार प्राथमिक आराेग्य केंद्रात आरटी-पीसीआर टेस्टची साेय करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात १००, तर प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रत्येकी ५० याप्रमाणे २०० नागरिकांच्या टेस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे इतर नागरिकांना चाचणीविना परत जावे जागते. परत जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण २०० ते ३०० एवढे आहे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी टेस्ट करणे आवश्यक असून, त्या करण्यासाठी प्रशासनाने पुरेशा प्रमाणात ‘टेस्टिंग किट’ उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
...
रॅपिड ॲन्टिजेन ‘टेस्टिंग किट’चा पुरवठा हाेत नसल्याने फक्त गंभीर रुग्णांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. आरटी-पीसीआरचे स्वॅब नमुने नागपूरला तपासणी पाठविले जातात. त्यांचे रिपाेर्ट यायला आठ ते दहा दिवस विलंब हाेत आहे. त्यामुळे शहरात ग्रामीण रुग्णालयामार्फत १०० टेस्ट, तर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रत्येकी ५० याप्रमाणे २०० असे एकूण ३०० टेस्ट केल्या जात आहेत. ‘टेस्टिंग किट’ प्राप्त हाेताच चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येईल.
- डाॅ. प्रीती इंगळे, अधीक्षक,
ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर.
...
तालुक्यात सध्या राेज ३०० नागरिकांच्या आरटी-पीसीआर टेस्ट केल्या जात आहेत. आरटी-पीसीआर तसेच रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे प्रमाण वाढविण्यात येईल.
- सचिन यादव, तहसीलदार, कळमेश्वर.