लकडगंज झोनच्या सहायक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 11:39 PM2020-07-03T23:39:29+5:302020-07-03T23:40:40+5:30

तुटलेल्या चेंबरमुळे मिनीमातानगरात दोन दिवसापूर्वी एक सायकल स्वार पडला होता. एका मुलाचा पाय चेंबरमध्ये फसला होता. याची माहिती प्रभाग-२४ चे नगरसेवक अनिल गेंडरे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांना दिली. ही बाब झलके यांनी गांभीर्याने घेत लकडगंज झोनचे सहायक आयुक्त साधना पाटील आणि कार्यकारी अभियंता दिलीप बिसेन यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून चेंबरला तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

Show cause notice to Assistant Commissioner, Lakdaganj Zone | लकडगंज झोनच्या सहायक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

लकडगंज झोनच्या सहायक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : तुटलेल्या चेंबरमुळे मिनीमातानगरात दोन दिवसापूर्वी एक सायकल स्वार पडला होता. एका मुलाचा पाय चेंबरमध्ये फसला होता. याची माहिती प्रभाग-२४ चे नगरसेवक अनिल गेंडरे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांना दिली. ही बाब झलके यांनी गांभीर्याने घेत लकडगंज झोनचे सहायक आयुक्त साधना पाटील आणि कार्यकारी अभियंता दिलीप बिसेन यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून चेंबरला तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत झलके यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चेदरम्यान झलके म्हणाले, डिप्टी सिग्नलमध्ये अनेक महिन्यापासून अपूर्ण सिमेंट रोड प्रकरणातील कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंत्याला गेल्या बैठकीत उत्तर मागितले होते. त्यानंतरही ही बाब अभि इंजिनिअरिंग व कार्यकारी अभियंत्याने गांभीर्याने घेतली नाही. आठ दिवसाच्या आत संबंधित सिमेंट रोडचे काम करण्याचे निर्देश दिले होते. नंदग्राम योजनेसंदर्भात नगररचना विभागाने अहवाल दिला आहे. संबंधित प्रकल्पाला गती प्रदान करण्यासाठी प्रस्तावित स्थळाचे मार्किंग सुरू करावे आणि त्यामुळे शहरातील गोठे शिफ्ट करणे शक्य होईल.
झलके म्हणाले, नागपूर सुधार प्रन्यासकडून ले-आऊटचे हस्तांतरण अजूनही झालेले नाही. ५७२ आणि १९०० ले-आऊटमध्ये विकास कामे प्रलंबित आहेत. त्याच्या विकासासाठी शासनाकडून विशेष अनुदानाची मागणी केली, परंतु निधी मिळालेला नाही. हस्तांतरण प्रक्रियेची माहिती सादर करून प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वित्तीय स्थितीची माहिती दरमहा स्थायी समितीला सादर करण्यास सांगितले आहे.

निधीच्या कमतरतेचा उल्लेख करा
झलके म्हणाले, कोणत्याही फाईलला निधीच्या कमतरतेच्या कारणाने थांबविण्यात येत असेल तर तसा उल्लेख फाईलमध्ये करणे आवश्यक आहे. आयुक्तांच्या निर्देशावर पावले उचलली जात असेल तर त्याकरिता अधीक्षक अभियंत्याला संबंधित निर्देशाचा फाईलवर उल्लेख करणे गरजेचे आहे. असे न केल्यास अनुशासनात्मक कारवाई वा एफआयआरसुद्धा केला जाऊ शकतो.

अग्निशमनच्या जुन्या गाड्या घेण्यास इन्कार
अग्निशमन विभागाच्या जुन्या गाड्या, मशिनरी, उपकरणे आदींच्या विक्रीसाठी ई-लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. जुनैद आॅटो डिस्पोजलने सर्वाधिक बोली लावली होती. पण कोविड-१९ संक्रमणाचा हवाला देत निविदाकाराने बोलीतून हटण्याची परवानगी मागितली. स्थायी समितीने संबंधित बोली रद्द करण्यास मंजुरी प्रदान केली. याचप्रकारे नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर रस्ते रुंदीकरणाच्या एका प्रकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

Web Title: Show cause notice to Assistant Commissioner, Lakdaganj Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.