‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:29 PM2018-08-30T22:29:41+5:302018-08-30T22:30:30+5:30

अनेकदा वीज बिल मिळालेच नसल्याची किंवा उशिरा मिळाल्याची ग्राहकांकडून ओरड होते. हे लक्षात घेऊन वीज बिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हा एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून वीज बिलाचा भरणा करता येईल.

Show 'sms', pay electricity bills | ‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा

‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा

googlenewsNext
ठळक मुद्देवाट पाहण्याची गरज नाही : बिल भरण्याचे अनेक पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकदा वीजबिल मिळालेच नसल्याची किंवा उशिरा मिळाल्याची ग्राहकांकडून ओरड होते. हे लक्षात घेऊन वीजबिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हा एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून वीज बिलाचा भरणा करता येईल.
महावितरणकडे केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यास येणाऱ्या एसएमएसच्या आधारे त्याला त्याच्या वीज बिलांचा भरणा वेळीच करणे शक्य झाले आहे. याशिवाय ठराविक मुदतीत पैसे भरून वीज बिलात मिळत असलेल्या प्रॉम्प्ट पेमेंट सवलतीचा लाभ घेणेही शक्य झाले आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी याबाबत माहिती दिली. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फे संपूर्ण राज्यात आक्रमकतेने राबविली जात असून, येणाºया सुट्यांचा काळ बघता वीज बिलाचा भरणा कसा करायचा, असा यक्षप्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत असला तरी बिलांचा भरणा सुलभतेने व्हावा म्हणून ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप आणि संकेतस्थळावरून आॅनलाईन पद्धतीने शिवाय अनेक सहकारी बँका, महावितरण आणि खासगी वीज बिल भरणा केंद्रांतून विजेचे बिल भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. महावितरणच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून किवा महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहक विजेचे बिल आॅनलाईन पद्धतीने भरू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे बिलाचा भरणा केल्यास शुल्क आकारण्यात येत असून. उर्वरित इतर सर्व पद्धतींच्या माध्यमातून (नेटबँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) वीज बिलाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. आॅनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे त्वरित पोच मिळते; महावितरणच्या या संकेतस्थळावर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास वीज बिल भरल्याचा तपशील व पावतीही उपलब्ध होते.

अ‍ॅप नसलेल्यांसाठी ‘क्यूआर कोड’
ज्या ग्राहकांकडे मोबाईल अ‍ॅप नाही त्यांच्याकरिता महावितरणच्या वीज बिलावर ‘क्यूआर’ (क्वीक रिसपॉन्स) कोड देण्यात आला असून, मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड केलेल्या क्यूआर कोड रीडरच्या माध्यमातून वीज बिलावरील हा कोड स्कॅन करता येतो. त्यावरून महावितरणची मोबाईल अ‍ॅपची लिंकही मिळते. वीज बिलावरील क्यूआर कोड हा अँड्रॉईड, आयओएस, विंडोज मोबाईलसाठी उपलब्ध आहे. सोबतच राज्यातील अनेक भागात प्रायोगिक स्तरावर फिरते वीज बिल भरणा केंद्रही सुरू करण्यात आले असून, साप्ताहिक बाजाराच्या दिवशी या केंद्रावर जाऊन ग्राहकांना वीज बिल भरणा करणे शक्य आहे.

Web Title: Show 'sms', pay electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.