नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:24 AM2020-07-31T00:24:11+5:302020-07-31T00:25:28+5:30

दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध पित्याकडून ६ लाख ५९ हजार रुपये हडपले.

Showing job lure in Nagpur 6. Fraud of Rs 59 lakh | नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध पित्याकडून ६ लाख ५९ हजार रुपये हडपले.
किरण राकेश शर्मा, राकेश शर्मा तसेच बाबा अली शेख अली खान ऊर्फ बाबाभाई अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी शर्मा बापलेक अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे पोलीस लाईनमध्ये राहतात.
शर्मा बापलेक तसेच त्यांचा साथीदार बाबाभाई या तिघांनी दाभा येथील अंबर कॉलनीत राहणारे लक्ष्मण महादेव कौराते (वय ६३) यांना २०१४ मध्ये गाठले. तुमच्या दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून आरोपींनी १० नोव्हेंबर २०१४ ते १६ऑगस्ट २०१६ या कालावधीत ६ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र आता सहा वर्षे होऊनही आरोपींनी त्यांच्या मुलांना नोकरी लावून दिली नाही. आपली फसवणूक झाली, हे लक्षात आल्यामुळे कौराते यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Showing job lure in Nagpur 6. Fraud of Rs 59 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.