चोरीच्या पैशांवरील दुचाकीची ‘शायनिंग’ पडली महागात; चोरट्याला अटक

By योगेश पांडे | Published: December 9, 2023 06:53 PM2023-12-09T18:53:38+5:302023-12-09T18:54:46+5:30

घरफोडीनंतर हाती लागले होते घबाड

Showoff of stolen bike money was expensive then the thief was arrested | चोरीच्या पैशांवरील दुचाकीची ‘शायनिंग’ पडली महागात; चोरट्याला अटक

चोरीच्या पैशांवरील दुचाकीची ‘शायनिंग’ पडली महागात; चोरट्याला अटक

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: चोरीच्या पैशांतून नवीन मोटारसायकल खरेदी करून शायनिंग मारणाऱ्या चोरट्याला पोलिसांना अटक केली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.

५ डिसेंबर रोजी निखील सुरेश रौंदळकर (४६, न्यू स्नेहनगर) हे शेगावला गेले असता अज्ञात चोरट्याने घरफोडी करत १.२२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यांच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून या गुन्ह्यात शरद शामराव कातलाम (२१, चिंचभवन, शांतीभवन निकेतन) हा सहभागी असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली केली.

प्रदीप उर्फ दादु ठाकुर (चिखली वस्ती, कळमना) याच्यासोबत त्याने न्यू स्नेहनगर तसेच वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शैलेषनगर येथे घरफोडी केल्याचे सांगितले. त्याने चोरीच्या पैशांतून नवीन मोटारसायकल घेतली होती. पोलिसांनी त्याच्याकडून २.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला व त्याला प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, राजेंद्र गुप्ता, प्रवीण महामुनी, बबन राऊत, सुनित गुजर, सुशांत सोळंके, रितेश तुमडाम, मनोज टेकाम, शरद चांभारे, योगेश सातपुते, रविंद्र राऊत, चंद्रशेखर भारती यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Showoff of stolen bike money was expensive then the thief was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक