मनपाच्या खाऊ गल्लीचे केले श्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:08 AM2021-07-07T04:08:46+5:302021-07-07T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने लाखो रुपये खर्च करून गांधी सागर तलाव परिसरात उभारण्यात आलेली खाऊ गल्ली पांढरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने लाखो रुपये खर्च करून गांधी सागर तलाव परिसरात उभारण्यात आलेली खाऊ गल्ली पांढरा हत्ती ठरली आहे. उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवसापासून हा प्रकल्प बंद पडला. या विरोधात नागपूर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने खाऊ गल्लीचे श्राद्ध करून खाऊ गल्ली सुरू करावी अशी मागणी केली.
मनपाने खाऊ गल्ली प्रकल्प उभारला. मात्र, उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी बंद पडला. यामुळे परिसरात असामाजिक घटकांची वर्दळ वाढली आहे. परिसरात असलेल्या स्टॉलधारकांनाही त्यांचा त्रास होत आहे. येथील ३२ स्टॉल्सपैकी काही स्टॉल्स नगरसेवकांच्या नातेवाइकांनी बळकावले होते, असा आरोप युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांनी यावेळी केला.
आंदोलन बंटी बाबा शेळके, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तौसीफ खान यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव सागर सतीश चव्हाण व नागपूर शहर महासचिव नयन लालाजी तरवटकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यात स्वप्निल बावनकर, आकाश गुजर, वसीम शेख, सौरभ शेळके, हेमंत कातुरे, जसप्रीत सिंह सिंधू, आदित्य सत्तभैया यादव, अमन गौर, अमन लुटे, मुबाशिर अहमद, विजय मिश्रा, सार्थक चिचमलकर, रोहित वाघधरे, पराग तरार, अवघेश तरार, आदित्य वैद्य, प्रणीत बिसने, अनिकेत बनाईत, शोएब अंसारी, अंथोनी डेनियल, आदींचा समावेश होता.