स्वर्णिम यात्रेवर निघाले श्रावक
By admin | Published: October 3, 2015 03:11 AM2015-10-03T03:11:47+5:302015-10-03T03:11:47+5:30
जैन संत मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने नागपुरातील सुमारे १७५० जैन भाविकांचा जत्था पवित्र तीर्थ सम्मेदशिखरजीला रवाना झाला.
जैन समाजातील १७५० भाविक सम्मेदशिखरजीला रवाना
नागपूर : जैन संत मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने नागपुरातील सुमारे १७५० जैन भाविकांचा जत्था पवित्र तीर्थ सम्मेदशिखरजीला रवाना झाला. महापौर प्रवीण दटके यांनी या भाविकांना सद्भावनेसह निरोप दिला.
शुक्रवारी सकाळी जैन भाविकांना घेऊन जाणारी विशेष रेल्वेगाडी नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर थांबली होती. अतिशय स्वच्छ २४ बोगी असलेली ही रेल्वेगाडी होती. प्रत्येक बोगीमध्ये जैन धर्माचे पवित्र चिन्ह, जैन आचार्यांचे चित्र लावण्यात आले होते. ढोल-ताशासह जैन समाजबांधव रेल्वे स्टेशनवर पोहोचले. येथे एका भव्य समारंभात यात्रेवर जाणाऱ्या सर्व भाविकांना पुष्पहार आणि टिळा लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. या भाविकांना सन्मानित करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे नेते अतुल कोटेचा, नगरसेवक आभा पांडे, बिज्जू पांडे, जुलुसे चिश्तिया कमिटीचे अध्यक्ष हाजी खलील बुरहानी, अभय जैन, बीमावाले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या यात्रेवरून ६ आॅक्टोबरला यात्रेकरू परततील. (प्रतिनिधी)