निसर्गरंगी रंगला सखी मंचचा ‘श्रावण सोहळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:27 PM2019-08-23T23:27:32+5:302019-08-23T23:54:42+5:30
लोकमत सखी मंचच्यावतीने व स्टार प्रवाह आणि मधूर शुगरच्या सहयोगाने आयोजित ‘श्रावण सोहळा’ गुरुवारी सक्करदरा येथील बुधवार बाजारात असलेल्या संताजी सभागृहात उत्साहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत सखी मंचच्यावतीने व स्टार प्रवाह आणि मधूर शुगरच्या सहयोगाने आयोजित ‘श्रावण सोहळा’ गुरुवारी सक्करदरा येथील बुधवार बाजारात असलेल्या संताजी सभागृहात उत्साहात पार पडला.
ज्या प्रमाणे श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते आणि त्यामुळे, मन उल्हासित होत असते, अगदी त्याच धर्तीवर कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सर्व सखी हिरव्या रंगाच्या साड्या घालून आल्या होत्या. त्यामुळे, संपूर्ण सोहळा निसर्गाच्या रंगात रंगून गेला होता. दरम्यान, सखींकरिता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका ‘मोलकरीण बाई’मध्ये आदिती प्रधानची भूमिका साकारणारी गायत्री सोहम, विनोदी मालिका ‘एक टप्पा आऊट’चे कलावंत शंतनू व प्रवीण आकर्षणाचे केंद्र ठरले. माऊली ग्रुपच्या वतीने ‘मंगळागौर’चे सादरीकरण करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
सोहळ्यात उपस्थित महिला आणि सखींना मधूर शुगर, रोकडे ज्वेलर्स आणि विप्रोच्या वतीने भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमात मधूर शुगरच्या वतीने रिजनल सेल्स हेड मंगेश पवार, असिस्टंट ब्रॅण्ड मॅनेजर झिशन सिद्दीकी, एरिया सेल्स मॅनेजर योगेश तकरेजा, पाक विशेषज्ज्ञ स्नेहल दाते, समाजसेविका डॉ. प्रीती मानमोडे, पूजा धांडे उपस्थित होते. कार्यक्रमाला रोशनी शेगांवकर, वसुधा गुढे व कीर्ती शेंडे यांनी विशेष सहकार्य केले. संचालन नेहा जोशी यांनी केले.
विविध स्पर्धंतील विजेते
- स्टार प्रवाह महाराणी - विजेता : रूपाली टिचकुले, प्रोत्साहन पुरस्कार : श्रुती भाटकर, संध्या पळसुले
- नऊवारी फॅशन शो - प्रथम : भक्ती कुवे, द्वितीय : शुभांगी नानवटकर, तृतीय : स्नेहा बावणे, प्रोत्साहन : ज्योत्स्ना नगरारे, अर्चना पगाडे
- उखाणे स्पर्धा - प्रथम : डॉ. अर्चना देशमुख, द्वितीय : संगीता पिसाळ, तृतीय : रोशनी शेगांवकर, प्रोत्साहन : संध्या वरघडे, शिला शेटे
- मधूर व्यंजन स्पर्धा - प्रथम : मंजुषा सुपेकर, द्वितीय : वसूधा गुढे, तृतीय : विशाखा करंजीकर, प्रोत्साहन : जया मुळे, मनिषा पंडित
- मेंदी स्पर्धा - प्रथम : मीनाक्षी जुमळे, द्वितीय : दीक्षा दमके
- श्रावण क्वीन स्पर्धा - प्रथम : चेतना पडोळे, द्वितीय : सुनैना भोंडे
- वेशभूषा - प्रथम : मंथन जलितकर, द्वितीय : आशा खेडकर, तृतीय : द्विती डवले