श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा! आता ३० टक्के सवलतीत करा मेट्रोतून प्रवास
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 20, 2024 07:03 PM2024-01-20T19:03:16+5:302024-01-20T19:04:24+5:30
अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे विधिवत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला होणार आहे.
नागपूर: अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे विधिवत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला होणार आहे. केवळ या शुभदिनी महामेट्रोने प्रवाशांना तिकिटात ३० टक्के सवलत जाहीर केली आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून २२ तारखेला शासकीय सुट्टी घोषित केली आहे.
शासकीय रजेच्या दिवशी नागपूरमेट्रोतर्फे ३० टक्के नेहमीच सवलत दिली जाते. तोच लाभ या २२ तारखेला अयोध्या येथील सोहळ्याच्या निमित्ताने नागपूरकरांना मिळणार आहे. त्यामुळे शहरात आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करणे अधिकच सोपे होणार आहे. मेट्रो सेवा ठरलेल्या वेळेप्रमाणे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत नेहमीप्रमाणे उपलब्ध असेल. प्रवाशांना तिकिट सवलतीचा फायदा घेता येईल.