पाणीटंचाई विरोधात लागले श्रीराम-जय रामचे नारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:11+5:302021-09-02T04:15:11+5:30

गांधीबाग झोमध्ये युवक काँग्रेसचे गदा आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात २४ बाय ७ तास पाणीपुरवठ्याचा दावा ...

Shri Ram-Jai Ram's slogans were raised against water scarcity | पाणीटंचाई विरोधात लागले श्रीराम-जय रामचे नारे

पाणीटंचाई विरोधात लागले श्रीराम-जय रामचे नारे

Next

गांधीबाग झोमध्ये युवक काँग्रेसचे गदा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात २४ बाय ७ तास पाणीपुरवठ्याचा दावा मनपाकडून केला जातो. दुसरीकडे पाणीपुरवठा खंडित करून टँकर माफियाला मालामाल करण्याचे काम सत्तापक्षाकडून केले जात आहे. मंगळवारी या विरोधात नागपूर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा जयजयकार करत मनपाच्या गांधीबाग झोनमध्ये गदा आंदोलन केले.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी मध्य नागपुरात बाईक रॅलीद्वारे नागरिकांशी संवाद साधला. मनपातील सत्ता पक्षाचे नेते आणि नगरसेवकांच्या माध्यमातून टँकर माफियाची कमाई होत आहे. पाणीपुरवठा खंडित करून टँकरद्वारे फक्त भाजप नगरसेवकांच्या वाॅर्डात पाणी देण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनात बंटी शेळके, शहर अध्यक्ष तौसिफ खान, उपाध्यक्ष आकाश गुजर, प्रदेश सचिव वसीम शेख, नयन तरवटकर, पीयूष जैसवाल, स्वप्निल बावनकर, नवेद शेख, नीलेश शिंदे, मोईज शेख, अखिलेश राजन, स्वप्निल ढोके, अभय रंदिवे, राहुल खैरकर, इरफान काजी, निखिल टेंभूरने, अनुराग राऊत, शोएब खान, जसप्रीत सिंग, आयुष राऊत, प्रणीत बिसने, अमन लुटे, विजय मिश्रा, सागर चव्हाण, आर्यन बावनकर, सचिन भुजंग, ॲन्थॉनी डेनियल, योगेश जामभूळकर, रोशन पंचबुधे, राज बोकडे, अक्षय घाटोले, प्रज्वल शनिवारे, राहुल बाबरें, सलीम शाह, आदींचा सहभाग होता.

Web Title: Shri Ram-Jai Ram's slogans were raised against water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.