उपराजधानीत श्रीरामनवमीच्या नवरात्राचा आज समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:30 AM2020-04-02T10:30:58+5:302020-04-02T10:46:57+5:30
नऊ दिवसपर्यंत भवानी मातेची आराधना केल्यानंतर गुरुवारी २ एप्रिल रोजी नवरात्र उत्सवाचा समारोप होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नऊ दिवसपर्यंत भवानी मातेची आराधना केल्यानंतर गुरुवारी २ एप्रिल रोजी नवरात्र उत्सवाचा समारोप होणार आहे. यामुळे मंदिरात सकाळपासून मातेचा अभिषेक, श्रुंगार आणि पूजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. यानंतर घटविसर्जन केले जाणार आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या सर्व धार्मिक आयोजनात भाविकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. पारडी स्थिती भवानी मातेच्या मंदिरात मातेचा अभिषेक झाल्यावर श्रृंगार आणि पूजन केले जाईल. पुढे ९ कन्यांना भोज चढविण्यात येईल. दुपारी रामजन्मोत्सवानंतर महाआरतीचे आयोजन केले जाणार आहे. यानंतर पुजारी आणि ट्रस्टींच्या उपस्थितीत घट विसर्जित करण्यात येतील.