जैन धर्माचे गाढे अभ्यासक श्रीकुमार पापळकर यांचे निधन
By Admin | Published: January 25, 2017 03:27 AM2017-01-25T03:27:58+5:302017-01-25T03:27:58+5:30
जैन धर्माचे गाढे अभ्यासक व सुप्रसिद्ध लेखक श्रीकुमार पापळकर यांचे मंगळवारी गणेशपेठ, अमरावती येथील निवासस्थानी निधन झाले.
नागपूर : जैन धर्माचे गाढे अभ्यासक व सुप्रसिद्ध लेखक श्रीकुमार पापळकर यांचे मंगळवारी गणेशपेठ, अमरावती येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. पापळकर यांच्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पुसद येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र पापळकर, महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, नरेंद्र पापळकर ही मुले आणि शीला व सुनीता या दोन मुली आहेत.
श्रीकुमार पापळकर यांनी जैन धर्मावर भावपूजा, मृत्यू कसा व्हावा, मुनी सुरतनाथविधान, मंदिर, जैन धर्माची पूजाविधी आदी पुस्तके लिहिली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध मासिक व वृत्तपत्रांमध्येही त्यांनी विपुल लेखन केले. (प्रतिनिधी)