केवळ घरीच होणार ‘शुभमंगल सावधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:02 PM2020-06-12T22:02:45+5:302020-06-12T22:06:27+5:30

नागपूर महापालिकेने शासनाचे निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत घरी होणाऱ्या लग्नकार्याला अनुमती प्रदान केली आहे. तथापि हॉल, मंगल कार्यालय किंवा तत्सम सभागृहात लग्न समारंभ आयोजित करण्यास अनुमती दिलेली नाही.

'Shubhamangal Sawdhan' to be held only at home | केवळ घरीच होणार ‘शुभमंगल सावधान’

केवळ घरीच होणार ‘शुभमंगल सावधान’

Next
ठळक मुद्देप्रशासनाची परवानगी : हॉटेल,मंगल कार्यालयामध्ये आयोजनास मनाई


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेने शासनाचे निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत घरी होणाऱ्या लग्नकार्याला अनुमती प्रदान केली आहे. तथापि हॉल, मंगल कार्यालय किंवा तत्सम सभागृहात लग्न समारंभ आयोजित करण्यास अनुमती दिलेली नाही.
महाराष्ट्र शासनाचे ३१ मे २०२० आणि नागपूर महापालिकेचे ५ जून २०२० ला 'मिशन बिगीन अगेन' संबंधी निघालेल्या आदेशानुसार जास्तीत-जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत घरी आयोजित होणाऱ्या लग्नकार्याला अनुमती प्रदान करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. मात्र हॉल, मंगल कार्यालय किंवा तत्सम सभागृह इत्यादी प्रतिबंधित बाबीत नमूद असल्याने अशा ठिकाणी कोणतेही समारंभ आयोजित करणे बेकायदेशीर आहे, असे मनपाव्दारे कळविण्यात आले आहे. तथापि शहरात वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता शक्यतो कोणतेही समारंभ , कार्यक्रम आयोजित करणे टाळावे तथापी जरी लग्नसमारंभासाठी ५० लोकांची परवानगी अनुज्ञेय असली तरी सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेता कमीत-कमी संख्या ठेवावी, असे आवाहन केले आहे.

Web Title: 'Shubhamangal Sawdhan' to be held only at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.