धंतोली झोन व ओंकारनगर नवे जलकुंभ यांचे उद्या शटडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:04 AM2020-11-27T04:04:56+5:302020-11-27T04:04:56+5:30
पाणीपुरवठा बाधित राहणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी तातडीच्या कामासाठी धंतोली झोन, वंजारीनगर जुने ...
पाणीपुरवठा बाधित राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी तातडीच्या कामासाठी धंतोली झोन, वंजारीनगर जुने व नवे जलकुंभ, रेशीमबाग, हनुमाननगर व ओंकारनगर (नवे) जलकुंभ यांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या जलकुंभांचा पाणीपुरवठा उद्या शुक्रवारी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान बंद राहील. तर शनिवार २८ नोव्हेंबरला सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
....
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग –
वंजारीनगर जुने व नवे जलकुंभ : जुना व नवा बाभुळखेडा, कुकडे ले-आऊट, वसंतनगर, वंजारीनगर, नवे व जुने कैलाशनगर, चंद्रमणीनगर, जोशीवाडी, श्रमजीवीनगर, प्रगतीनगर, रामेश्वरी रोड, विश्वकर्मानगर, बजरंगनगर, सावित्रीबाई फुलेनगर, म्हाडा क्वाॅर्टर, पोलीस क्वाॅर्टर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सोमवारी क्वाॅर्टर, रघुजीनगर, आयुर्वेदिक ले-आऊट, आदिवासी कॉलनी.
हनुमाननगर जलकुंभ : हनुमाननगर, प्रोफेसर कॉलनी, चंदननगर, पीटीएस क्वाॅर्टर, वकीलपेठ, महेश कॉलनी, सोमवारी क्वाॅर्टर, सिरसपेठ, सरईपेठ, रेशीमबाग.
रेशीमबाग जलकुंभ : ओमनगर, सुदामपुरी, आनंदनगर, नेहरूनगर, महावीरनगर, शिवनगर, जुने नंदनवन भागात कॉलनी, गायत्रीनगर, गणेशनगर, जुनी शुक्रवारी, लभानतांडा.
ओंकारनगर (नवे) जलकुंभ : आकाशनगर, अवधूतनगर, शेषनगर, गीतानगर, एकमतनगर, मंगलदीपनगर १ व २, कल्पतरूनगर, कल्याणेश्वरनगर, मुद्रानगर, शाहूनगर, अलंकारनगर, नरहरीनगर, चिंतामणीनगर, चंद्रिकानगर १ व २, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अंबानगर, गगनदीप सोसायटी, जय गुरुदेवनगर, बाळकृष्णनगर.