गळती दुरुस्तीसाठी शटडाऊन, पाणीपुरवठा बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:06 AM2020-12-09T04:06:22+5:302020-12-09T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फुटाळ्याच्या संरक्षक भिंतीच्या खाली एक गळती आढळून आली आहे. ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटाळ्याच्या संरक्षक भिंतीच्या खाली एक गळती आढळून आली आहे. ही गळती थांबविण्यासाठी महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ५०० मिमी व्यासाच्या नव्याने टाकण्यात आलेल्या फुटाळा लाईनवर आंतरजोडणीचे काम करण्याचे ठरविले आहे. यासाठी उद्या गुरुवारी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान या लाईनवर शटडाऊन घेण्यात येईल. यामुळे संपूर्ण संजयनगर, ट्रस्ट ले-आऊट, पंकजनगर, राजूनगर, सुदामनगरी, पांढराबोडीचा वरचा भाग आदी भागाचा पाणीपुरवठा बंद राहील.
....
हनुमाननगर जलकुंभाची स्वच्छता
वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहिमेंतर्गत हनुमाननगर जलकुंभ बुधवारी स्वच्छ करण्याचे ठरविले आहे. यामुळे बुधवारी या जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार नाही. यात हनुमाननगर, प्रोफेसर कॉलनी, चंदननगर, पीटीएस क्वाॅर्टर, वकीलपेठ, महेश कॉलनी, सोमवारी क्वाॅर्टर, सिरसपेठ, सरईपेठ, रेशीमबाग वस्त्यांचा समावेश आहे.