नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन
By नरेश डोंगरे | Published: January 2, 2024 09:54 PM2024-01-02T21:54:03+5:302024-01-02T21:54:44+5:30
नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे.
नागपूर : हिट ॲन्ड रनच्या नवीन कायद्याच्या बडग्याच्या विरोधात देशभर ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. या संपाच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी ऑटोचालकही सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे.
नागपूर जिल्ह्यातील विविध शहरातील शाळांमध्ये चालणाऱ्या महासंघाच्या ऑटोचालकांनी बुधवारी आपले ऑटो बंद ठेवून या आंदोलनाला समर्थन द्यावे, असे आवाहन नायडू यांच्यासह चरणदास वानखेडे, मोहन बावणे, कैलास श्रीपतवार, अरविंद पवार, देवेंद्र बेले, इसराइल खान, दासबोध आनंदम, अजय उके, देवेंद्र बागडे, अरविंद धवराल, किशोर माचेवार आणि विनोद कारेकर आदींनी केले आहे. महासंघाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधाने निवेदनही दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, ऑटोचालकांच्या अनेक संघटना आहेत. त्यांच्यापैकी कितींचा या आंदोलनात सहभाग आहे ते स्पष्ट होऊ शकले नाही.