श्याम पेठकर यांना सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:34 PM2019-06-15T21:34:52+5:302019-06-15T21:35:40+5:30
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय शाखेतर्फे दरवर्षी रंगकर्मींना गो. ब. देवल स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखक म्हणून यंदा चित्रपट व नाट्यलेखक श्याम पेठकर यांना त्यांच्या ‘तेरव’ या नाटकासाठी प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय शाखेतर्फे दरवर्षी रंगकर्मींना गो. ब. देवल स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखक म्हणून यंदा चित्रपट व नाट्यलेखक श्याम पेठकर यांना त्यांच्या ‘तेरव’ या नाटकासाठी प्रदान करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे १४ जून रोजी मुंबईच्या यशवंतराव नाट्य मंदिरात आयोजित भव्य सोहळ्यात पेठकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर नाडकर्णी व अभिनेत्री दया डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सोहळा मुंबई येथे यशवंतराव नाट्य मंदिरात सायंकाळी पार पडला. या सोहळ्यात कमलाकर नाडकर्णी आणि अभिनेत्री दया डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्याम पेठकर यांना लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या ‘ऋतुस्पर्श’ या ललितलेख संग्रहास २००७ चा भैरू रतन दमाणी पुरस्कार मिळालेला आहे. गोष्ट छोटी डोंगराएवढी या मराठी चित्रपटाच्या संवाद लेखनासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. तेरव हा दीर्घांक असून आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांचा जीवनसंघर्ष त्यांनी या नाटकातून मांडला आहे. त्यांनी हरीश इथापे यांच्यासह स्थापन केलेल्या अॅग्रो थिएटरमार्फत हे नाटक रंगमंचावर आणण्यात आले. या नाटकाची महाराष्ट्रभर चर्चा झालेली आहे.