वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ जन्मलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:43+5:302021-05-27T04:07:43+5:30
- बुद्ध जयंतीला विविध कार्यक्रमांचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला. त्यामुळे या ...
- बुद्ध जयंतीला विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला. त्यामुळे या तिथीला बुद्ध पौर्णिमाही म्हटले जाते. या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. नागपुरात विविध संघटनांच्यावतीने बुधवारी गौतम बुद्धांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कोरोना संक्रमणाच्या स्थितीमुळे बहुतांश कार्यक्रम ऑनलाइन पार पडले.
दमक्षेच्यावतीने ‘अत्तं दीपं भवं’ ()
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने ‘अत्तं दीपं भवं’ हा संगीतमय कार्यक्रम आभासी माध्यमाद्वारे पार पडला. ‘बुद्ध वंदना ही धम्म वंदना’ या वंदना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वाटे युगायुगाचा अंधार दूर झाला, वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ जन्मलेला, अहा धम्म दीपा तुझे गीत गाऊ, घबराए जब मन अनमोल आदी गाणी आकांक्षा नगरकर देशमुख व पियूष वाघमारे यांनी सादर केले. गायकांना सिंथेसायजरवर श्रीकांत पिसे, बासरीवर अरविंद उपाध्ये, तबल्यावर राहुल देशमुख, ढोलकवर पंकज यादव, ऑक्टोपॅडवर अक्षय हरले यांनी साथसंगत केली. निवेदन विक्रम मोरे यांनी केले.
-----------
बसपाने केले दीक्षाभूमीवर अभिवादन ()
तथागत गौतम बुद्ध यांच्या २०६५ व्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टीच्यावतीने दीक्षाभूमी येथे गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहणे, सदानंद जामगडे, प्रवीण पाटील, नितीन वंजारी, सुरेंद्र डोंगरे, चंद्रशेखर कांबळे, शिवपाल नितनवरे, चंद्रकांत कांबळे, भालचंद्र जगताप, चंद्रमणी गणविर, प्रकाश फुले, सुमित जांभुळकर उपस्थित होते. रामेश्वरी राेडवरील कुंजीलाल पेठेत असलेल्या बुद्ध मूर्तीलाही यावेळी अभिवादन करण्यात आले.
---------
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मास्क, सॅनिटायझरचे वितरण ()
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने कोरोना जनजागृती अभियानांतर्गत पक्षाच्या सीताबर्डी येथील केंद्रीय कार्यालयातून राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गाैतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कपिल लिंगायत, विपीन गाडगीलवार, अजय चव्हाण, बापू भोंगाडे, स्वप्नील महल्ले, पीयूष हलमारे, कुशीनारा सोमकुंवर, नीरज पराडकर, गौवर गाेयंका, नरेंद्र ढवळे, महिंद्र मेश्राम, संजय ढोबळे, अखिल तिरपुडे, सुरज मेश्राम, लक्ष्मीकांत खरे, उत्तम हुमणे, निशांत मंचलवार, महिंद्र पावडे, आदित्य सुखदेवे उपस्थित होते.
-----------------
आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र परिसरात बोधीवृक्षाचे रोपण ()
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत व बौद्ध अध्ययन विभागाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र परिसरात बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. बुद्धीस्ट स्टुडेंट असोसिएशनच्यावतीने बौद्ध अध्ययन केंद्राचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. नीरज बोधी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. डॉ. तुळसा डोंगरे, प्रा. डॉ. सरोज वाणी चौधरी, स्टुडेंट असोसिएशनचे अध्यक्ष भिख्खू महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे, सिद्धार्थ फोपरे, श्यामराव हाडके, सखाराम मंडपे, प्रसेनजित फोपरे उपस्थित होते.
-----------
बौद्ध तत्त्वज्ञानावर ऑनलाइन व्याख्यानमाला
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. विकास जांभुळकर यांचे ‘व्यावहारिक स्वरूपातील बौद्ध धम्म’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. नीरज बोधी होते. तनुजा झिलपे यांनी विद्यापीठ गीत सादर केले. संध्या खांडेकर यांनी बुद्ध वंदना घेतली. प्रास्ताविक प्रा. नीलिमा गजभिये यांनी केले. संचालन आम्रपाली गजभिये यांनी केले तर आभार प्रा. नंदा भगत यांनी मानले.
..............