सब स्टेशनला घेराव, वीज बिल जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:57 PM2020-08-01T21:57:39+5:302020-08-01T21:58:56+5:30
लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले.
पार्टीचे कार्यकर्ता शनिवारी सकाळी शहरातील सर्व ३२ सब स्टेशनजवळ एकत्र आले. त्यांनी राज्य सरकार व उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात नारेबाजी केली. क्वेटा कॉलनीतील चिंतेश्वर मंदिर, वर्धमाननगर, शांतिनगर, छापरुनगर, तुकडोजी पुतळा, भोला गणेश चौक, सक्करदरा मिर्ची बाजार, मोठा ताजबाग, गंगाबाई घाट, तुळशीबाग, शहीद चौक आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, रामदास आंबेटकर व गिरीश व्यास यांच्यासह माजी आमदार सुधाकर देशमुख व डॉ. मिलिंद माने सहभागी झाले होते. त्याचबरोबर सत्तापक्ष नेते संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा, संजय बंगाले, रुपा रॉय, परिणिता फुके, निशांत गांधी, प्रगती पाटील, प्रमोद कौरती, भूषण शिंगणे, अर्चना पाठक, विजयसिंह ठाकुर, सुनील अग्रवाल, सुनील हिरणवार, उज्ज्वला शर्मा, किशोर वानखेडे, मुन्ना यादव, मीनाक्षी तेलगोटे, प्रकाश भोयर, लखन येरावार, विजय चुटेले, संदीप गवई, मनोज चापले, मनिषा अतकरे, जयश्री रारोकार, देवेंद्र मेहर, प्रदीप पोहाणे, चेतना टांक, धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, देवेन दस्तुरे, प्रशांत कामडी, परशु ठाकूर, बंडू राऊत, गुड्डू तिवारी, दीपराज पार्डीकर, जितेंद्र ठाकूर, दिलीप गौर, लता येरखेडे आदी सहभागी झाले होते.