‘रायसोनी’त मूक न्यायालय
By admin | Published: April 1, 2016 03:27 AM2016-04-01T03:27:47+5:302016-04-01T03:27:47+5:30
जी.एच. रायसोनी कॉलेजतर्फे आयोजित अकरावा क्षण सुनावणी आणि मूक न्यायालयाच्या निर्णायकाची भूमिका न्यायमूर्ती एम.एल. ताहिलयानी आणि मुंबई
नागपूर : जी.एच. रायसोनी कॉलेजतर्फे आयोजित अकरावा क्षण सुनावणी आणि मूक न्यायालयाच्या निर्णायकाची भूमिका न्यायमूर्ती एम.एल. ताहिलयानी आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. बदर यांनी बजावली. त्यांचे स्वागत प्राचार्य जे. एल. अपराजित यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. समारोपीय समारंभात प्राचार्य अपराजित यांनी दोन्ही न्यायमूर्तींचे तसेच हर्षा बदर यांचे स्वागत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांनी सर्व चमूंचे स्वागत करून समारंभाला सुरुवात झाली. ए. एम. बदर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजचा दिवस तुमच्या सर्वांसोबत घालवायची इच्छा असल्यामुळे येथे आलो आहो. गुन्हेगारी प्रकरणात चांगल्या पद्धतीने सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी साहिल देवानी याची स्तुती करून त्यांच्या चमूने चांगले कार्य केल्याचा उल्लेख केला. त्यांनी अंतिम फेरीत पोहोचलेल्या एन.एल.यू. ओडिशा आणि जी.एन.एल.यू. गुजरात या चमूचे अभिनंदन केले. त्यांनी जे. एल. अपराजित आणि देवानी यांचे आभार मानले. प्रमुख पाहुणे एम. एल. ताहिलयानी यांनी मूक न्यायालयाच्या समारोपानिमित्त कायद्याच्या शिक्षणाचा दर्जा वाढल्याचे सांगून मूक न्यायालयासारख्या स्पर्धा शिकण्यासारख्या असल्यामुळे त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. जर ९५ टक्के परिश्रम घेतल्यास ५ टक्के यश तुम्हाला १०० टक्के यशस्वी बनवीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आमच्या वेळी अशा स्पर्धा नसल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी अंतिम विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)