सिल्क कॉटन फॅब प्रदर्शनाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:10+5:302020-12-13T04:26:10+5:30

नागपूर : विविध राज्यांमधील कॉटन व सिल्कचे प्रसिद्ध आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असणारे प्रदर्शन व विक्री ४ डिसेंबरपासून चिटणवीस ...

Silk Cotton Fab Exhibition | सिल्क कॉटन फॅब प्रदर्शनाचा

सिल्क कॉटन फॅब प्रदर्शनाचा

Next

नागपूर : विविध राज्यांमधील कॉटन व सिल्कचे प्रसिद्ध आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असणारे प्रदर्शन व विक्री ४ डिसेंबरपासून चिटणवीस सेंटर, हिस्लॉप कॉलेजवळ, सिव्हील लाईन्स येथे सुरू आहे. रविवार, १३ डिसेंबर अखेरचा दिवस आहे. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. प्रदर्शनात एकूण ४९ स्टॉल आहेत. हॅण्डलूमवर उत्कृष्ट कलाकुसर करणाऱ्या विणकरांद्वारे विणलेल्या कॉटन व विविध प्रांतातील सिल्क साड्या, ड्रेस मटेरियल, सूट, स्टोल्स, कुर्ता, कुर्ती, दुपट्टे यासह फॅशन ज्वेलरी व गृहसजावटीच्या आकर्षक वस्तू आहेत. काही उत्पादनांवर सूट आहे. बिहारची भागलपुरी सिल्क, टसर सिल्क, कोसा, खाली सिल्क, उत्तर प्रदेशचे लखनवी चिकनवर्क, जामदनी, बनारसी सिल्क, मध्य प्रदेशची माहेश्वरी सिल्क, चंदेरी, गुजरातची पटोला, बांधणी, कच्छी, एम्ब्रायडरी, राजस्थानची बांधेज, ब्लॉक प्रिंट, सागनेरी प्रिंट, कर्नाटकची बंगलोर सिल्क, प्रिंटेड क्रेप, ताबी सिल्क, आंध्रप्रदेशचे धर्मावरम, गडवाल, व्यंकटगिरी, मंगळगिरी, उपदा, कलमकारी, पोचमपल्ली, बंगाल व छत्तीसगडची उत्पादने आहेत. प्रवेश नि:शुल्क असून पार्किंगची व्यवस्था आहे. (वा.प्र.)

Web Title: Silk Cotton Fab Exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.