१२ दिवसात चांदी ६ हजारांनी घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:46 AM2019-09-18T00:46:04+5:302019-09-18T00:46:52+5:30
आंतराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनुसार देशात काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ दाखविली होती. त्यानंतर पुन्हा घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनुसार देशात काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ दाखविली होती. त्यानंतर पुन्हा घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. लग्नसराईचे ग्राहक आता बाजारपेठेत खरेदी करू लागले आहेत.
२० दिवसापूर्वी चांदीचे दर प्रतिकिलो ५२ हजार रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर घसरण होऊन मंगळवारी दर ४६,६०० रुपयांवर आले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दर ७०० रुपयांनी कमी झाले. सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांनी सणांमध्ये चांदीच्या उपकरणांची खरेदी वाढविली आहे. याशिवाय १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ४०,२०० रुपयांवर पोहोचले होते. या मौल्यवान धातूच्या किमतीतही घसरण सुरू आहे. मंगळवारी दर ३७,९०० रुपयांवर स्थिर होते. सोमवारच्या तुलनेत दर ५० रुपयांनी वाढले आहेत.
सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले की, तसे पाहिल्यास सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालीच नाही. तीन महिन्यांपूर्वी सोन्याचे दर ३२ हजारांवर तर चांदीचे दर ४२ हजार रुपये होते. तुलनात्मरित्या भाव जास्तच आहेत. अनेक वर्षांचा अनुभव पाहता सोने आणि चांदीचे भाव वाढल्यास कमी होतात आणि कमी झाल्यानंतर पुन्हा वाढतात. तीन महिन्यांच्या तुलनेत भाव जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.