कामठीत हनुमान जयंती साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:28+5:302021-04-28T04:08:28+5:30
कामठी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कामठी शहरात मंगळवारी हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. भाविकांनी घरीच पूजाअर्चा ...
कामठी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कामठी शहरात मंगळवारी हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. भाविकांनी घरीच पूजाअर्चा करून देशावरील कोरोनाचे संकट दूर कर, अशी प्रार्थना संकटमोचन मारुतीरायाच्या चरणी केली. शहरात हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने हनुमान जयंतीचे व्यापक स्वरूपात आयोजन केले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत हनुमान जयंती उत्सव समितीने यंदाही साधेपणाने हनुमान जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. तसेच भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी मंदिराचे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले. फक्त मोजक्याच मंदिरात नियमांचे पालन करून दर्शन घेण्याची मुभा देण्यात आली. अनेक मंदिरात भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेऊन प्रार्थना केली. येथील गांधी चौकात असलेल्या अलकेश्वर बालाजी मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी हजारो भाविकांची दर्शनाकरिता गर्दी राहायची. यंदा मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाचे पालन करीत घरीच पूजाअर्चा केली.