पार्श्वगायक मुकेश यांना गायकांनी वाहिली स्वरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:08+5:302021-09-03T04:09:08+5:30
नागपूर : ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीच्या वतीने अमृत भवन येथे पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवात गायकांनी प्रसिद्ध पार्श्वगायक स्व. ...
नागपूर : ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीच्या वतीने अमृत भवन येथे पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवात गायकांनी प्रसिद्ध पार्श्वगायक स्व. मुकेशचंद्र माथूर यांना त्यांच्या पुण्यस्मरणदिनी स्वरांजली वाहिली.
तत्पूर्वी प्रसिद्ध तबलावादक बाळासाहेब पाठक, अरविंद पाटील, प्रशांत ढाबरे, ध्वनी अभियंता सत्यवान, मन्सूर, जहीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर अरविंद पाटील, राजू व्यास, गेडामकर, पुष्पलता भोर, स्वस्तिका ठाकूर, विजय कीर्तने, डॉ. महेश तिवारी, प्रमोद किटके, अजय तांबे, मुकेश यांच्या शैलीतील मिलन समूहाचे प्रमुख सुनील गजभिये, अमृत भवनचे संचालक शशिकांत वाघमारे यांनी मुकेश यांची विविध गाणी सादर केली. यावेळी संगीत संयोजक पंकज सिंह यांच्या संकल्पनेतील ‘जीना यहाँ, मरना यहाँ’ या गीतावर पंकज सिंह व प्रशांत खडसे (की-बोर्ड), मनोज चिरागळे (गिटार), राजू ठाकूर (ऑक्टोपॅड), पंकज येळणे (तबला), नितीन जनवारे (ढोलक), राजू गजभिये (तुंबा), दत्ता खंडारे (सॅक्सोफोन) यांनी फ्युजन सादर केले. निवेदन रज्जाक व साजिद कुरैशी यांनी केले. ध्वनिव्यवस्था बंडू पदम यांची होती. यावेळी प्रमोद देशमुख, विजय कीर्तने, पी. कुमार, रिनेश जाने, शेखर शामकुवर, संगीता गावंडे, पुरुषोत्तम पांडे, प्रणय कुथे, प्रदीप गजभिये, लॉरेन्स लुईस, आदिती शामकुवर उपस्थित होते.
...........