नागपूरसह देश-विदेशातील गायक झाले सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:08+5:302021-03-22T04:07:08+5:30

- सुलभा कृष्णराव गोखले स्मृती संगीतसंध्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाने पुन्हा एकदा जगाला विळखा घातला आहे ...

Singers from home and abroad including Nagpur became participants | नागपूरसह देश-विदेशातील गायक झाले सहभागी

नागपूरसह देश-विदेशातील गायक झाले सहभागी

Next

- सुलभा कृष्णराव गोखले स्मृती संगीतसंध्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाने पुन्हा एकदा जगाला विळखा घातला आहे आणि त्यामुळे संपूर्ण जग टाळेबंदीत जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सुलभा कृष्णराव गोखले स्मृती संगीतसंध्येत नागपूरसह देश-विदेशातील गायक, रसिकांनी सहभाग घेत भजनांचा आनंद लुटला.

रायपूर येथील संगीत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दीपक बेडेकर व मंजूषा बेडेकर यांची संकल्पना होती. यात रायपूर, बिलासपूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, मुंबई, बेंगळुरू, युके, दुबई आदी ठिकाणांहून कलाकार व रसिकांनी सहभाग घेतला. यात मंजूषा बेडेकर, डॉ. दीपक बेडेकर, शास्त्रीय गायिका सरोज देवधर यांनी भजन सादर केले. त्यांना तबल्यावर कमल मुखर्जी व संवादिनीवर मंजूषा बेडेकर यांनी संगत केली. यासोबतच आरोही, अंतरा छाबडा, आदित्य गोखले, ज्योत्स्ना गाडगीळ, सारिका कुळकर्णी, रेणुका वझे, मनीषा गोखले, डॉ. स्मृती देशपांडे, चित्रा व प्रतीक्षा गोखले, मृणालिनी गाडगीळ, नंदिनी थत्ते, त्रिविक्रम थत्ते, विजया बेडेकर यांनीही सादरीकरण केले. निवेदन माधवी गोखले यांनी केले तर आभार मिलिंद गोखले व धनंजय गोखले यांनी मानले.

..............

Web Title: Singers from home and abroad including Nagpur became participants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.