‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’ झाले तरी गायन अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:10 AM2021-02-23T04:10:46+5:302021-02-23T04:10:46+5:30

- सुनील वाघमारे यांचे गायनाचे १५० पूर्ण - दररोज दोन तास गायिली ३७५० गाणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Singing is still a unique world record | ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’ झाले तरी गायन अजूनही सुरूच

‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’ झाले तरी गायन अजूनही सुरूच

Next

- सुनील वाघमारे यांचे गायनाचे १५० पूर्ण

- दररोज दोन तास गायिली ३७५० गाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील प्रसिद्ध गायक सुनील वाघमारे यांनी गायनाचे ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’ स्थापित केले आहे. फेसबुक लाईव्हद्वारे १५० दिवस दररोज दोन तास गायनाचा विश्वविक्रम त्यांनी रविवारी पूर्ण केला. हे दिवस आणखी वाढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

सुनील वाघमारे यांनी नऊ वर्षापूर्वी ३ ते ७ मार्च २०१२ दरम्यान सलग १०५ तास गायनाचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले होते. यावेळी त्यांनी १२५२ गाणी सादर केली होती. हा विक्रम अद्यापही अबाधित आहे, हे विशेष. त्यानंतर सलग १५० दिवस दररोज दोन तास गायनाचा हा नवा विक्रम स्थापित करून शहराचे नाव गौरवान्वित केले आहे.

कोरोनामुळे सगळीच क्षेत्रे बंदिस्त पडली असताना, सांस्कृतिक क्षेत्राला नव्याने उर्जितावस्था देण्याच्या हेतूने वाघमारे यांनी २५ सप्टेंबर २०२० पासून या नव्या रेकाॅर्डच्या दिशेने पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आणि २१ फेब्रुवारी २०२१ रोजी १५० दिवस पूर्ण केले. दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत ते गात आहेत. यासाठी त्यांनी ९०० गाण्यांची निवड केली. दररोज २५ गाणी कुठल्याही व्यत्ययाशिवाय सादर करत त्यांनी ३६ व्या दिवशी ९०० गीतांची एक फेरी पूर्ण केली. अशा आतापर्यंत चार फेऱ्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत. या तऱ्हेने १५० दिवसात त्यांनी ३७५० गाणी सादर केली. मात्र, रेकॉर्डसाठी सुरू झालेली ही गायनाची दिनचर्या न थांबवता या विक्रमाला आणखी लांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापूर्वी गुजरातमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर दररोज १ तास असे १०० दिवस गायनाचा विक्रम स्थापित केला होता. त्याने हे गायन १३४ दिवस केले होते. मात्र, वर्ल्ड रेकॉर्ड अमेजिंगने त्याचे १०० दिवसच गृहित धरले होते. ते रेकॉर्ड वाघमारे यांनी कधीच मोडले आहे. वाघमारे यांच्या रेकाॅर्डची नोंद पंजाब येथील भटिंडामधील सुनिक वर्ल्ड रेकॉर्ड दररोज घेत आहे.

.........

Web Title: Singing is still a unique world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.