सख्ख्या बहिणी एकमेकींच्या बनल्या वैरी; एकीचा जीव गेला तर दुसरीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 09:01 PM2021-12-25T21:01:02+5:302021-12-25T21:01:28+5:30

Nagpur News मालमत्तेसाठी दोन सख्ख्या बहिणी एकमेकींच्या वैरी बनल्या. त्यांच्यात झालेल्या हाणामारीत एका महिलेच्या मृत्यू झाला. तर, तिच्या मृत्यूला कारण ठरलेल्या तिच्या सख्ख्या बहिणीवर अजनी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Sisters became enemies of each other; One was killed and another was charged | सख्ख्या बहिणी एकमेकींच्या बनल्या वैरी; एकीचा जीव गेला तर दुसरीवर गुन्हा दाखल

सख्ख्या बहिणी एकमेकींच्या बनल्या वैरी; एकीचा जीव गेला तर दुसरीवर गुन्हा दाखल

googlenewsNext

नागपूर - मालमत्तेसाठी दोन सख्ख्या बहिणी एकमेकींच्या वैरी बनल्या. त्यांच्यात झालेल्या हाणामारीत धर्मशीला बालचंद्र डहाट (वय ५४) नामक महिलेच्या मृत्यू झाला. तर, तिच्या मृत्यूला कारण ठरलेल्या तिच्या सख्ख्या बहिणीवर अजनी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, धर्मशीला यांचा भाऊ महेंद्र २० वर्षांपूर्वी जोशीवाडीतील जोसेफ नामक व्यक्तीच्या घरी राहायला आला होता. त्यानंतर धर्मशीला डहाट आणि जयशीला सुरेंद्र गणवीर (वय ५०) या दोन बहिणी ही तेथेच येऊन वेगवेगळ्या रूममध्ये राहू लागल्या. जोसेफ यांची देखभाल महेंद्र करीत असल्याने जोसेफने त्यांचे राहते घर महेंद्रच्या नावावर करण्याचे आश्वासन दिले होते. २ मे २०२१ ला जोसेफचा मृत्यू झाला.

त्यानंतर या दोन बहिणींनी जोसेफच्या घरावर मालकी हक्क सांगून एकमेकींशी वाद वाढवला. त्यांच्यात नेहमीच खटके उडू लागले. १८ डिसेंबरला दुपारी १२ च्या सुमारास या दोन बहिणीत हाणामारी झाली. झटापटीत धर्मशीला खाली फरशीवर पडल्याने तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यावेळी महेंद्र डहाट (वय ४५) यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, डॉक्टरांकडून आलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी जयशिलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. तिची चाैकशी केली जात आहे.

---

Web Title: Sisters became enemies of each other; One was killed and another was charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.