चौकाचौकांत ठिय्या, गल्लीतही दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:24+5:302021-09-10T04:11:24+5:30

गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजच्या घडीला शहरातील प्रत्येक गल्लीत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. चौकाचौकांत टोळ्या करून ...

Sit at the crossroads, panic in the streets | चौकाचौकांत ठिय्या, गल्लीतही दहशत

चौकाचौकांत ठिय्या, गल्लीतही दहशत

Next

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आजच्या घडीला शहरातील प्रत्येक गल्लीत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. चौकाचौकांत टोळ्या करून हुंदडणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडी पाहून मनात धडकी भरली नाही, असे होत नाहीच! दिवसा विश्रांतीसाठी आडोश्याला जाणारी कुत्री सायंकाळनंतर चौकांचा आणि गल्लींचा ताबा घेतात. रस्त्यावरची वर्दळ मंदावल्यावर त्यांची दहशत सुरू होते. अशा वेळी रात्री एकट्यादुकट्याने प्रवास करणाऱ्यांची खैर नसते.

हॉटेल्स आणि मांसविक्रीच्या दुकानांलगत परिसरात त्यांची संख्या अधिक असून, त्यांचे वर्तनही आक्रमक असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. शहरात रात्री दहानंतर कोणत्याही भागात किंवा चौकात फिरल्यास बहुतेक सर्वच चौकांत कुत्र्यांच्या झुंडी दिसतात. रात्री लांब सुरात ओरडणे, वाहनांच्या सीट फाडणे, मागे धावणे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगूस, त्यांची भांडणे या घटना आता नव्या नाहीत.

अनेक कुत्री हिंस्र असतात. दुचाकीचा आणि कारचा पाठलाग करतात. त्यामुळे भीतीपायी अनेकांचे अपघात घडतात. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, मोटारसायकलस्वार, लहान मुले यांना भटके कुत्रे चावल्याच्या घटना शहरात अधिक आहेत.

...

संवेदनशील चौक

स्टेडियम परिसर, पंचशील चौक, लोखंडी पूल परिसर, तुकडोजी महाराज चौक, नंदनवन, वाठोड चौक, संघ भवन परिसर, कॉटन मार्केट, शिरसपेठ, घाट रोड, गणेशपेठ, मॉडेल मील, बैदनाथ चौक, खामला चौक, दीक्षाभूमी परिसर, व्हीआरसी परिसर, सोनेगाव चौक, ओंकारनगर चौक, मानेवाडा चौक, छोटा ताजबाग चौक, मोठा ताजबाग चौक, राणी दुर्गावती चौक, कमाल चौक, जरीपटका चौक, इंदोरा, मोमीनपुरा, फ्रेंड्स कॉलनी चौक, जागृती कॉलनी, उत्थाननगर चौक, गोरेवाडा चौक, बोरगाव चौक, गोकुल हाऊसिंग सोसायटी, गिट्टी खदान भाजी मार्केट, गीता नगर, बिजली नगर, छावणी दुर्गा माता मंदिर जयताळा चौक, रामबाग चौक, हिवरीनगर चौक, पार्वतीनगर चौक, आदी.

...

चौकातील अनुभव

खामला चौक : चौकालगत असलेले ऑरेंज सीटी हॉस्पिटल आणि लगतच्या झोपडपट्टीमुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. ऐन रस्त्यावर झुंडी बसून असतात. रात्री दुचाकींच्या मागे धावतात.

स्टेडियम परिसर : परिसरात हॉटेल्स व लागूनच नाला असल्याने अन्नासाठी कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असतात. धंतोली परिसरात दवाखाने अधिक आहेत. रुग्णांच्या नातेवाइकंनी उघड्यावर टाकलेल्या अन्नासाठी ते धाव घेतात.

सोनेगाव चौक : खामला मटन मार्केट परिसर, भाजी मार्केट परिसर व सोनेगावकडे जाणाऱ्या स्मशानभूमी परिसरात मार्गावर झुंडीने कुत्री असतात. कचरागाड्या येथे उभ्या राहतात. दाट झाडी, दुर्गंधी, अनावश्यक मांस उघड्यावर फेकणे यासाठी कारणीभूत आहे.

मोमीनपुरा : मांसविक्रीची दुकाने अधिक असल्याने चटावलेल्या कुत्र्यांच्या झुंडी या भागात आहेत. त्यांच्या हिंस्रपणाचा अनेकांना अनुभव आहे.

मुख्य रेल्वे स्टेशन : प्रवाशांनी फेकलेले अन्न खाण्यासाठी या परिसरात कुत्र्यांची गर्दी असते. फलाटवरही ते भटकत असतात.

गिट्टी खदान भाजी मार्केट : मांस विक्री, उकीरडा यामुळे पररिसरात कुत्र्यांच्या झुंडी आहेत. अनेकांनी जखमी, बेवारस कुत्री या भागात सोडली आहेत. या टोळ्यांनी दुचाकींवर हल्ले केल्याच्या अनेक घटना आहेत.

...

(जोड आहे...)

Web Title: Sit at the crossroads, panic in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.