सहा एकरातील काेबीचे पीक खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:29+5:302021-09-15T04:12:29+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामामुळे राेडवरील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडसर निर्माण झाला आणि पाणी शेतात ...

The six-acre cabbage crop is bad | सहा एकरातील काेबीचे पीक खराब

सहा एकरातील काेबीचे पीक खराब

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामामुळे राेडवरील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडसर निर्माण झाला आणि पाणी शेतात शिरले. या पाण्यामुळे सहा एकरातील काेबीचे पीक खराब झाले. हा प्रकार कळमेश्वर तालुक्यात नुकताच घडला.

कळमेश्वर-नागपूर मार्गावरील रेल्वे फाटकाजवळील वाहतूककाेंडी साेडविण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिज निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या रेल्वे ओव्हरब्रिजचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी कंत्राटदार कंपनीने राेडच्या दाेन्ही बाजूंनी पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खाेदल्या आहेत. या नाल्यांलगत शेती आहे.

या नाल्या समतल नसल्याने, त्यातून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी त्यात तुंबून राहते. कळमेश्वर तालुक्यात आठवडाभरापासून पावसाच्या सरी काेसळत आहेत. त्यामुळे या दाेन्ही नाल्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. यातील एका नालीतील पाणी संजय जयस्वाल, रा.कळमेश्वर या शेतात झिरपले. त्यामुळे त्यांच्या शेतात दलदल तयार झाल्याने सहा एकरातील काेबीचे पीक खराब झाले आहे. यावर रेल्वे प्रशासन व कंत्राटदार कंपनीने तातडीने प्रभावी उपाययाेजना कराव्या व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

जबाबदारी स्वीकारणार काेण?

या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. वास्तवात, ते काम एका वर्षात पूर्ण करावयाचे हाेते. या नाल्याही दीड वर्षापूर्वीच खाेदण्यात आल्या. त्या अपूर्ण असून, समतल नाहीत. या नाल्यांमधील पाणी सलग दुसऱ्याही वर्षी शेतात माेठ्या प्रमाणात झिरपल्याने शेत पाणथळ झाले आहे. त्यामुळे या शेतात पुढील काही वर्षे चांगले पीक येण्याची शक्यता मावळली आहे. यात शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत असल्याने, याची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्नही संजय जयस्वाल यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केला आहे.

Web Title: The six-acre cabbage crop is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.