नागपूर जिल्ह्यातील साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षेविना होणार पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 09:03 PM2020-03-20T21:03:24+5:302020-03-20T21:05:17+5:30
१ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील ४११७ शाळेतील वर्ग १ ते ८ चे साडेसहा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची शाळा २६ जूनला सुरू होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संक्रमणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद केल्या. शिक्षकांच्याही ५० टक्के रोटेशननुसार ड्युट्या लावत्या. आता १ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील ४११७ शाळेतील वर्ग १ ते ८ चे साडेसहा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची शाळा २६ जूनला सुरू होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेमध्ये विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील अख्ख्या शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित के ल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युट्या लावल्या. कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी शासनाने ३१ मार्च ही डेडलाईन दिली आहे. त्यानंतर शाळा सुरू होईल की नाही, हे कोरोनावर कितपत नियंत्रण आले त्यावर निर्भर राहणार आहे. पण तरीही शालेय विद्यार्थ्यांना त्याची लागण होऊ नये म्हणून शासनाने ३१ मार्चनंतर विद्यार्थी शाळेत येऊच नये यासाठी १ ते ८ वर्गाच्या परीक्षाच रद्द करून, सरळ उत्तीर्ण केले आहे. मात्र वर्ग ९ व ११ च्या परीक्षा होणार आहे. पण त्याही ३१ मार्चनंतरच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय हा सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. पालकांनी सुट्या लागल्यामुळे कुठलेही प्लॅनिंग न करता, विद्यार्थी कसा सुरक्षित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सतर्कता बाळगणे, स्वच्छता राखणे हा एकमेव उपाय असल्यामुळे पालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला जातोय.