नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार सहा मीटरचा फूट ओव्हरब्रीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:59 AM2018-08-07T00:59:24+5:302018-08-07T01:00:20+5:30

नागपूर रेल्वस्थानकावर सध्या इटारसी आणि मुंबई एण्डकडील भागात मिळून दोन फूट ओव्हरब्रीज (एफओबी) आहेत. या ब्रिजची रुंदी प्रत्येकी तीन मीटर आहे. परंतु रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वर्दळ आणि या ब्रीजवरील गर्दी पाहता हे पूल प्रवाशांसाठी अपुरे पडतात. त्यामुळे मुंबईसारखी चेंगराचेंगरीची घटना होऊ नये, प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर सावकाश जाता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने आणखी एक सहा मीटर रुंदीचा फूट ओव्हरब्रीज साकारण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव मुंबई मुख्यालयाला पाठविला आहे.

Six meters foot overbridge at Nagpur railway station | नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार सहा मीटरचा फूट ओव्हरब्रीज

नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार सहा मीटरचा फूट ओव्हरब्रीज

Next
ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : दिव्यांग, ज्येष्ठ प्रवाशांसाठी सुविधा


 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वस्थानकावर सध्या इटारसी आणि मुंबई एण्डकडील भागात मिळून दोन फूट ओव्हरब्रीज (एफओबी) आहेत. या ब्रिजची रुंदी प्रत्येकी तीन मीटर आहे. परंतु रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वर्दळ आणि या ब्रीजवरील गर्दी पाहता हे पूल प्रवाशांसाठी अपुरे पडतात. त्यामुळे मुंबईसारखी चेंगराचेंगरीची घटना होऊ नये, प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर सावकाश जाता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने आणखी एक सहा मीटर रुंदीचा फूट ओव्हरब्रीज साकारण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव मुंबई मुख्यालयाला पाठविला आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १३० ते १४५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. यात प्रवाशांची संख्याही ३५ ते ४० हजारावर असते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर असलेल्या एफओबीची रुंदी त्यामानाने कमी आहे. त्यामुळे अनेकदा त्यावर मोठी गर्दी होते. यात प्रवाशांना घेऊन जाणारी बॅटरी कार आणि लगेजची गाडी आली की प्रवाशांना एफओबीवर एका कोपºयात उभे राहावे लागते. मुंबई आणि देशातील इतर रेल्वेस्थानकावर यापूर्वी एफओबीवर प्रवाशांची धावपळ झाल्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना भविष्यात नागपूर रेल्वेस्थानकावर घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासन अनेक दिवसांपासून नव्याने एफओबी तयार करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या एफओबीची रुंदी वाढविण्याचा विचार करीत होते. अखेर नवा सहा मीटर रुंदीचा फूट ओव्हरब्रीज तयार करण्याच्या निर्णयावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो मुंबई मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यालयाने या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून फूट ओव्हरब्रीजच्या कामाला शुभारंभ करण्यात येणार आहे.
‘एफओबी’चा प्रस्ताव मुख्यालयात रवाना
‘नागपूर रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या फूट ओव्हरब्रीजवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नव्याने सहा मीटर रुंदीचा एफओबी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव मुंबई मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळताच एफओबीचे काम सुरू करण्यात येईल.’
-एस. जी. राव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
 

Web Title: Six meters foot overbridge at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.