नागपुरात  सहा पानटपऱ्या सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:02 AM2018-07-19T01:02:43+5:302018-07-19T01:04:25+5:30

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, खर्रा, सुगंधित तंबाखू व सुपारीची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या नऊ पानटपऱ्याची अन्न व औषध विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी १६ आणि १७ जुलैला तपासणी केली आणि २.४ किलो वजनाचा १६६५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. त्यापैकी सहा पानटपऱ्या सीलबंद करण्यात आल्या.

Six pan kios sealed in Nagpur | नागपुरात  सहा पानटपऱ्या सीलबंद

नागपुरात  सहा पानटपऱ्या सीलबंद

googlenewsNext
ठळक मुद्दे एफडीएची कारवाई : खर्रा व सुगंधित तंबाखूची विक्री


 

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, खर्रा, सुगंधित तंबाखू व सुपारीची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या नऊ पानटपऱ्याची अन्न व औषध विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी १६ आणि १७ जुलैला तपासणी केली आणि २.४ किलो वजनाचा १६६५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. त्यापैकी सहा पानटपऱ्या सीलबंद करण्यात आल्या.
सीलबंद केलेल्या पानटपऱ्यांमध्ये सिव्हील लाईन्स, प्रशासकीय इमारत परिसरातील महालक्ष्मी पान मंदिर, तहसील कार्यालयासमोरील लाडू पान मंदिर, सदर गांधी चौक येथील अधर शृंगार, वंजारीनगर अजनी चौक येथील एसबीडी पान अ‍ॅण्ड टी स्टॉल, ईएसआयसी हॉस्पिटल चौकातील मिक्की पान शॉप, धंतोली येथील आदर्श पान मंदिर आदींचा समावेश आहे. वर्धा येथे १७ जुलैला १० पानटपऱ्या सीलबंद करण्यात आल्या.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे, शरद कोलते, संतोष कांबळे व नारायण सरकटे यांच्या नेतृत्त्वात अन्न सुरक्षा अधिकारी अ.दा. राऊत, जी.टी, सातकर, शि.सु. देशपांडे आणि पी.व. मानवटकर यांनी केली. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची आस्थापना सीलबंद करण्याची धडक मोहीम या पुढेही सुरू राहील, असे केकरे यांनी सांगितले.

Web Title: Six pan kios sealed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.