चेन्नई एग्मोर आणि जोधपूरदरम्यान विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:25 AM2020-12-11T04:25:44+5:302020-12-11T04:25:44+5:30

तिरुनेलवेल्ली-बिलासपूरदरम्यान स्पेशल रेल्वे नागपूर : प्रवासी सुविधा आणि लांब प्रतीक्षा यादी ध्यानात ठेवून ०६०७० तिरुनेलवेल्ली-बिलासपूर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे १३ ...

Six rounds of special train between Chennai Egmore and Jodhpur | चेन्नई एग्मोर आणि जोधपूरदरम्यान विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या

चेन्नई एग्मोर आणि जोधपूरदरम्यान विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या

Next

तिरुनेलवेल्ली-बिलासपूरदरम्यान स्पेशल रेल्वे

नागपूर : प्रवासी सुविधा आणि लांब प्रतीक्षा यादी ध्यानात ठेवून ०६०७० तिरुनेलवेल्ली-बिलासपूर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे १३ ते २७ डिसेंबरपर्यंत आणि ०६०६९ बिलासपूर-तिरुनेलवेल्ली फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे १५ ते २९ डिसेंबरपर्यंत एका सप्ताहात एक दिवस धावणार आहे.

०६०७० तिरुनेलवेल्ली-बिलासपूर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे प्रत्येक रविवारी रात्री ०१.०५ वाजता तिरुनेलवेल्ली येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी रात्री ९.३५ वाजता बिलासपूरला पोहचेल. या रेल्वेचे नागपुरात आगमन दुपारी २.१० वाजता आणि प्रस्थान २.१५ वाजता होणार आहे. तर ०६०६९ बिलासपुर-तिरुनेलवेल्ली फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे प्रत्येक मंगळवारी सकाळी ७.४३ वाजता बिलासपूर येथून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी रात्री ३.१५ वाजता तिरुनेलवेल्ली पोहचेल. या रेल्वेचे नागपुरात आगमन मंगळवारी दुपारी २.५५ वाजता आणि प्रस्थान ३ वाजता होणार आहे. ही रेल्वे गोंदिया, तुमसर, भंडारा रोड, चंद्रपूर, बल्लारशाह येथे थांबणार आहे. या रेल्वेत एकूण २२ कोच राहतील. यामध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित, तीन तृतीय श्रेणी वातानुकूलित, दहा शयनयान, सहा द्वितीय साधारण, दोन ब्रेक कम जनरेटर कारचा समावेश राहणार आहे.

Web Title: Six rounds of special train between Chennai Egmore and Jodhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.