एकाच रात्री फोडली भाजीपाला विक्रीची सहा दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 07:07 PM2022-09-14T19:07:45+5:302022-09-14T19:09:37+5:30

Wardha News भाजीबाजारात सोमवारच्या रात्री भुरट्या चोरांनी प्रवेश करीत भाजीपाला विक्रीची सहा दुकाने फोडून रोख रकमेसह डिजिटल वजनकाटे असा एकूण ७५ हजार रुपयांची रक्कम व इतर साहित्य चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली.

Six shops selling vegetables were broken into in one night | एकाच रात्री फोडली भाजीपाला विक्रीची सहा दुकाने

एकाच रात्री फोडली भाजीपाला विक्रीची सहा दुकाने

Next
ठळक मुद्देरोख रकमेसह वजनकाटे लंपासमुख्य भाजी बाजारातील घटना


वर्धा : शहरातील बजाज चौकात असलेल्या मुख्य भाजीबाजारात सोमवारच्या रात्री भुरट्या चोरांनी प्रवेश करीत भाजीपाला विक्रीची सहा दुकाने फोडून रोख रकमेसह डिजिटल वजनकाटे असा एकूण ७५ हजार रुपयांची रक्कम व इतर साहित्य चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

शहरातील बजाज चौकात मुख्य भाजीबाजार भरतो. मात्र, सध्या हा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात स्थलांतरित केल्याने काही किरकोळ भाजीविक्रेत्यांची या बाजारात दुकाने आहेत. सोमवारी भाजीबाजार बंद असल्याने रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी भाजीबाजारात प्रवेश करुन आलू कांद्याचे व्यावसायिक महंमद शफी चौधरी यांच्या दुकानातील टिव्ही सेट, इलेक्ट्राॅनिक्स वजन काटा व गल्यातील २५०० रुपये, किशोर सोनकर यांच्या दुकानातील वजन काटा, ७०० रुपये, लहसून कट्टा, रमेश कडू यांच्या दुकानातील ४ वजन काटे, ५०० रुपये रोख, तर त्याच दुकानात ठेवलेला नरेश हरणे यांचा १ वजन काटा, मंगेश सोनकर यांच्या दुकानातील वजन काटा आणि ५८०० रुपये रोख, नवीन पिशव्या, दोन पोती अगरबत्ती पाकिट, विजय सोनकर यांच्या दुकानातील वजन काटा, २ हजार रुपये रोख, राजू गोलाईत यांच्या दुकानातील नविन पिशव्या,२०० रुपये चिल्लर, असा एकूण अंदाजे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.
याबाबतची सामुहिक तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Six shops selling vegetables were broken into in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.