सहा हजारांवर ‘सुपर स्प्रेडर्स’ची चाचणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:16+5:302021-05-17T04:07:16+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बाजारपेठा, बँक, शासकीय आणि खाजगी ...

Six thousand Super Spreaders tested () | सहा हजारांवर ‘सुपर स्प्रेडर्स’ची चाचणी ()

सहा हजारांवर ‘सुपर स्प्रेडर्स’ची चाचणी ()

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बाजारपेठा, बँक, शासकीय आणि खाजगी कार्यालये, दुकाने इत्यादी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर’ची कोरोना चाचणी करण्यात आली, अशी चाचणी दहाही झोनमध्ये करण्यात येत आहे.

मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शनिवारी सहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांची चाचणी करण्यात आली.

महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य विभागाला सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि संजय निपाणे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या सहकार्याने डॉ. शुभम मनगटे आणि चमूकडून चाचणी करण्यात आली. या कार्यात ११ मोबाइल व्हॅन आणि ४५ चाचणी केंद्रांचा वापर करण्यात आला. सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

मनपाच्या वतीने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी विशेष शिबिर आयोजित करून चाचणी करण्यात आली. दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाचणीच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था आपापल्या संबंधित झोनमध्ये केलेली आहे.

मधुमेह, सिकलसेलग्रस्तांचीही होणार चाचणी

सध्या अस्तित्वात असलेल्या चमूव्यतिरिक्त आता नवीन १० चमूसुद्धा चाचणीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. बालकांची तसेच मधुमेह आजाराने त्रस्त नागरिकांची आणि सिकलसेल रुग्णांची, तसेच विविध आजारांनी ग्रस्त, रुग्णांचीसुद्धा चाचणी करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना कोरोनासदृश लक्षणे आहेत; अथवा जे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत, अशा व्यक्तींनी चाचणी करून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Six thousand Super Spreaders tested ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.