भोपाळमधील नॉन इंटरलॉकिंग वर्कमुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या 'या' सहा गाड्या जाम
By नरेश डोंगरे | Published: September 9, 2023 01:11 PM2023-09-09T13:11:31+5:302023-09-09T13:12:34+5:30
२८ ते ३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे विभागाकडून नॉन इंटरलॉकिंग वर्क
नागपूर : भोपाळ विभागात सुरू होणाऱ्या नॉन इंटरलॉकिंग वर्कमुळे या महिन्याच्या अखेर विविध मार्गाने धावणाऱ्या ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात नागपूर मार्गे धावणाऱ्या सहा रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे.
मध्यप्रदेशातील मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागात जुझारपूर - पावरखेडा दरम्यान उड्डाणपुलाजवळ २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे विभागाकडून नॉन इंटरलॉकिंग वर्क केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गाने धावणारी १२१६० जबलपूर- अमरावती एक्सप्रेस २८ ते ३० सप्टेंबर, तर २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान धावणारी १२१५९ अमरावती - जबलपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. २२१७५ नागपूर - जयपूर एक्सप्रेस २८ सप्टेंबरला आणि २२१७६ जयपूर - नागपूर एक्सप्रेस २९ सप्टेंबरला रद्द करण्यात आली आहे. ०१३१७ आणि ०१३१८ आमला ईटारसी आमला एक्सप्रेस २५ ते ३० सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरची २२१२५ नागपूर अमृतसर एसी एक्सप्रेस आणि २ ऑक्टोबरची अमृतसर नागपूर एक्सप्रेसही रद्द करण्यात आली असून इंदूर शिवनी एक्सप्रेस २८ ते३० सप्टेंबर, छिंदवाडा इंदूर एक्सप्रेस २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०९१७ इंदूर पुरी एक्सप्रेस २६ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबरची २०९१८ पूरी इंदूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
भविष्यात रेल्वे प्रवाशांना अधिक चांंगली सुविधा मिळाव्या या हेतूने हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या होणाऱ्या त्रासाबद्दल प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.