बदललेल्या मार्गाने धावणार सहा रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:18+5:302020-12-30T04:10:18+5:30
राजमुंद्रीमध्ये यार्ड रिमॉडेलिंगचे काम नागपूर : दक्षिण रेल्वे, विजयवाडा विभागातील राजमुंद्री स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम, नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु ...
राजमुंद्रीमध्ये यार्ड रिमॉडेलिंगचे काम
नागपूर : दक्षिण रेल्वे, विजयवाडा विभागातील राजमुंद्री स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम, नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून जाणाऱ्या सहा रेल्वेगाड्या आपल्या नियोजित मार्गाशिवाय बदललेल्या मार्गाने चालविण्यात येणार आहेत. यात रेल्वेगाडी क्रमांक ०२८५१ विशाखापट्टनम-निजामुद्दीन (४ फेऱ्या) स्पेशल ट्रेन २८ डिसेंबर, १, ४ आणि ८ जानेवारीला आपल्या नियोजित मार्ग विजयवाडा, वारंगल, बल्लारशाहऐवजी बदललेला मार्ग विशाखापट्टनम, विजयानगरम, रायगढ, टिटलागढ, रायपूर, गोंदिया, नागपूरमार्गे धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२८५२ निजामुद्दीन-विशाखापट्टनम स्पेशल रेल्वेगाडी (४ फेऱ्या) ३० डिसेंबर, ३ आणि ६ जानेवारीला आपला नियोजित मार्ग नागपूर- बल्लारशाह, वारंगल, विजयवाडा ऐवजी बदललेला मार्ग नागपूर, गोंदिया, रायपूर, टिटलागढ, रायगढ, विजयानगरम, विशाखापट्टनम या मार्गाने धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०८४०१ पुरी-ओखा विशेष रेल्वेगाडी (२ फेरी) ३ जानेवारीला नियोजित मार्ग खुर्दा रोड जंक्शन, विशाखापट्टनम, विजयवाडा, वारंगल, बल्लारशाह, वर्धा ऐवजी बदललेला मार्ग विजयानगरम, रायगढ, टिटलागढ, रायपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा मार्गाने धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०८४०२ ओखा-पुरी विशेष रेल्वेगाडी (२ फेरी) ३० डिसेंबर आणि ६ जानेवारीला नियोजित मार्ग वर्धा, बल्लारशाह, वारंगल, विजयवाडा, विशाखापट्टनम, खुर्दा रोड जंक्शन ऐवजी बदललेला मार्ग वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, टिटलागढ, रायगढ, विजयानगरम या मार्गाने धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०८५०१ विशाखापट्टनम-गांधीधाम विशेष रेल्वेगाडी (२ फेरी) ३१ डिसेंबर आणि ७ जानेवारीला नियोजित मार्ग विजयवाडा, वारंगल, बल्लारशाह, वर्धा ऐवजी बदललेला मार्ग विजयानगरम, रायगढ, टिटलागढ, रायपूर, नागपूर, वर्धा या मार्गाने धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०८५०२ गांधीधाम-विशाखापट्टनम विशेष रेल्वेगाडी (२ फेरी) ३ जानेवारीला नियोजित मार्ग वर्धा, बल्लारशाह, वारंगल, विजयवाडा ऐवजी बदललेला मार्ग वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, टिटलागढ, रायगढ, विजयानगरम या मार्गाने धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.