नागपूर जिल्हा परिषदेतील सहा ग्राम विकास अधिकारी झाले विस्तार अधिकारी

By गणेश हुड | Published: March 16, 2024 03:23 PM2024-03-16T15:23:36+5:302024-03-16T15:24:33+5:30

सदर पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने ९ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनासोबत बैठक घेऊन लोकसभा निवडणुक आचारसंहिता पूर्वी पदोन्नती व सेवा विषयक लाभाचे आदेश जारी करण्याची  मागणी केली होती.

Six Village Development Officers of Zilla Parishad became Extension Officers | नागपूर जिल्हा परिषदेतील सहा ग्राम विकास अधिकारी झाले विस्तार अधिकारी

नागपूर जिल्हा परिषदेतील सहा ग्राम विकास अधिकारी झाले विस्तार अधिकारी

नागपूर :  जिल्हा परिषदेतील सहा ग्राम विकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी (पंचायत) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत.

 सहा ग्राम विकास अधिकाऱ्यांत  वाय. आर. गायकवाड  (ग्राम पंचायत, सोनेगाव निपाणी, ता. नागपूर) यांची पंचायत समिती कुही येथे, कीर्ती बोंदरे (सोनेघाट, रामटेक) यांची विस्तार अधिकारी (कृषि) पंचायत समिती पारशिवनी , आर .बी. फुके  (भिष्णुर, नरखेड) यांची पंचायत  समिती नरखेड येथे, अनिल सांगोळे (गोंडेगाव) यांची पंचायत समिती मौदा येथे, बी.पी. शृंगारे (भानेगव, सावनेर) यांची पंचायत समिती कळमेश्वर येथे तर  डी. एम. टेंभेकर (पिपळा डाकबंगला, सावनेर) यांची पंचायत समिती सावनेर येथे  विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे.

सदर पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने ९ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनासोबत बैठक घेऊन लोकसभा निवडणुक आचारसंहिता पूर्वी पदोन्नती व सेवा विषयक लाभाचे आदेश जारी करण्याची  मागणी केली होती. अखेर सदर पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले. निर्णयाचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे व नरेंद्र धनविजय यांनी स्वाग्त केले आहे.

Web Title: Six Village Development Officers of Zilla Parishad became Extension Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.