बसचालक-वाहकाच्या सतर्कतेमुळे सहा महिला चाेर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:08+5:302021-09-02T04:17:08+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने चाेरीला गेल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बसचालक व वाहकास सूचना ...

Six women arrested for bus-carrier alert | बसचालक-वाहकाच्या सतर्कतेमुळे सहा महिला चाेर अटकेत

बसचालक-वाहकाच्या सतर्कतेमुळे सहा महिला चाेर अटकेत

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने चाेरीला गेल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बसचालक व वाहकास सूचना दिली. या दाेघांनीही सतर्कता बाळगत बसमधील सहा महिला चाेरांना हुडकून काढले व पाेलिसांच्या स्वाधीन केले. त्या दागिन्यांची किंमत तीन लाख रुपये हाेती. हा प्रकार आंभाेरा-भंडारा मार्गावरील नवेगाव परिसरात मंगळवारी (दि. ३१) दुपारी घडला.

भंडारा आगाराच्या बस (क्र. एमएच ४० एक्यू-६१८८) भंडाऱ्याहून नवेगावला जायला निघाली. ही बस नवेगाव शिवारात येताच बसमधील राजश्री विवेक लंके (२५, रा. मांढळ, ता. कुही) यांनी त्यांचे साेन्या-चांदीचे दागिने चाेरीला गेल्याची माहिती प्रवाशांसह बसचालक नितीन मस्के व वाहक माला जनबंधू यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचवेळी बस (क्र. एमएच ४० वाय ५००८) माैद्याहून कुही तालुक्यातील आंभाेऱ्यातून भंडाऱ्याला जायला निघाली हाेती. संशय आल्याने बसचालक नितीन मस्के त्या बसचे चालक नितेश समर्थ व वाहक कल्पना गभणे यांना फाेनवर दिली.

नितीन मस्के यांनी या दाेघांनीही त्यांच्या बसमध्ये माैद्याहून संशयास्पद व्यक्ती बसली काय याबाबत विचारणा केली. त्यातच नितेश समर्थ यांनी त्यांची बसमध्येच एका हाॅटेलजवळ थांबविली आणि बसमधील कुणालाही खाली उतरू न देता खातरजमा करायला सुरुवात केली. त्यांना बसमधील एक महिला संशयास्पद स्थितीत आढळून आली. एका महिलेने ते दागिने चाेरले असल्याचे स्पष्ट हाेताच दाेघांनीही लगेच पाेलिसांना सूचना दिली. त्या बसमध्ये महिला चाेरट्यांची टाेळीच प्रवास करीत हाेती. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे पाच ताेळे साेन्याचे व तीन ताेळे चांदीचे दागिने आढळून आले. ते दागिने तिने चाेरी केल्याचे मान्य करताच तिला अटक केली व दागिने राजश्री विवेक लंके यांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून सहा महिलांना अटक केली. या सहाही महिला नागपूर शहरातील रहिवासी आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फाैजदार चांगदेव कुथे करीत आहेत.

Web Title: Six women arrested for bus-carrier alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.