नागपूरच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये बोर ते कलिंगडाच्या आकाराची संत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 02:17 PM2017-12-17T14:17:47+5:302017-12-17T14:21:34+5:30

सुरेश भट सभागृहात आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फळांच्या प्रदर्शनात तब्बल १३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात बोराच्या आकारापासून तर कलिंगडाच्या आकाराची संत्री पाहून नागपूरकर आश्चर्यचकित होत आहेत.

Size of Jujube fruit to watermelon in Nagpur at the World Orange Festival | नागपूरच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये बोर ते कलिंगडाच्या आकाराची संत्री

नागपूरच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये बोर ते कलिंगडाच्या आकाराची संत्री

googlenewsNext
ठळक मुद्दे१३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन

ऑनलाईन लोकमत 
नागपूर : जागतिक संत्रा महोत्सव असेल आणि त्यात संत्र्याचे विविध प्रकार व जाती पाहायला मिळणार नाही, हे शक्य नाही. संत्र्याचे केवळ प्रकारच नव्हे तर आकारही आगळेवेगळे आहे. सुरेश भट सभागृहात आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फळांच्या प्रदर्शनात तब्बल १३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात बोराच्या आकारापासून तर कलिंगडाच्या आकाराची संत्री पाहून नागपूरकर आश्चर्यचकित होत आहेत.
या प्रदर्शनात फ्लेम ग्रेप फ्रूट,, युएस-१४५ पमेलो, पमेलो-१ आणि कॅलमॅड्रिन जातीच्या फळांनी नागरिकांना आकर्षित केले. प्रदर्शनात सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट आयसीएआर नागपूरमध्ये कार्यरत रामा पाईकराव यांनी सांगितले की, फ्लेम ग्रेप फ्रूट, यूएस पमेलो, कॅलामेंड्रीन जाती आयसीएआर, सीसीआरआयमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. फ्लेम ग्रेप फ्रूट हे आतून लाल रंगाचे असते. आणि ५०० ते ६०० ग्रामपर्यंत याचे वजन असते. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे लाभदायक असते. यूएस-१४५ पमेलो बाहेरून हिरवा, परंतु आतून पंढ ऱ्या  रंगाचा असतो. याचा स्वाद सामान्य संत्र्यासारखाच असतो. वजन जवळपास ८५० ग्राम असते. पमेलो-१ कलगिंडाच्या आकाराचा संत्रा आहे. आतून याचा रंग हलका पिवळा आहे. डॉ. वायएसआर हार्टिकल्चर विद्यापीठाने तयार केले आहे. याच्याशिवाय कॅलोमेंड्रीन बोराच्या आकाराचा संत्रा आहे. तो खायला अतिशय आंबट आहे. याचे रोप घरामध्ये सजावटीच्या रूपात वापरतात.
या लिंबूवर्गीय फळांच्या प्रदर्शनात आयसीएआरसह आसाम अ‍ॅग्रीकल्चर विद्यापीठ , आयसीएआर, पी.ए.व्ही लुधियाना, डॉ. व्ही.एस. आर. (तिरुपती, आंध्रप्रदेश) यांनी लागवड केलेल्या लिंबूवर्गीय फळांसह हरमनप्रीत सिंग (राजस्थान), अभिजित गुप्ता (नरखेड), श्रीकांत नेरकर (पिपळा के.), एस. ब्रह्म रेड्डी (कडपा, आंध्रप्रदेश), नत्थू काळे (सुसुंद्री, ता. कळमेश्वर), सुरेश जगताप (तोंडाखैरी), मनोज चांडक, विलास गुल्हाणे, दिलीप तिजारे (खापरी के. नरखेड), नितीन राऊत (नरखेड), यू. कालेरंगा (लंगदार, मिझोरम), बनिया लाल (कामठी), रुपेश क्षीरसागर (पांढुर्णा, मध्य प्रदेश), दीपक कुहाडे (सौंसर, मध्य प्रदेश), प्रभात पाटील (अचलपूर, जि. अमरावती), अनिल टेंभे, शिवशंकर काळे (सुसुंद्री), वर्षा सरोदे (कोहळी, ता. कळमेश्वर), राजेंद्र रेवतकर (मोहपा), योगेश्वर सातपुते (नागपूर), या शेतक ऱ्यांचीही फळे प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Size of Jujube fruit to watermelon in Nagpur at the World Orange Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.