एसजेएएन क्रिकेट; नागपूर लोकमत पुन्हा चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:40 AM2020-02-28T10:40:40+5:302020-02-28T10:41:14+5:30

लोकमत संघाने गतविजेत्या टाइम्स ऑफ इंडियावर ५ धावांनी विजय नोंदवून २२ व्या एसजेएएन आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवले.

SJAN Cricket: Lokmat winner | एसजेएएन क्रिकेट; नागपूर लोकमत पुन्हा चॅम्पियन

एसजेएएन क्रिकेट; नागपूर लोकमत पुन्हा चॅम्पियन

Next
ठळक मुद्देरोमहर्षक अंतिम लढतीत टीओआयवर ५ धावांनी मात


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या रोमहर्षक अंतिम लढतीत लोकमत संघाने गतविजेत्या टाइम्स ऑफ इंडियावर ५ धावांनी विजय नोंदवून २२ व्या एसजेएएन आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवले. याआधी दोनदा जेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर लोकमतने यंदा चॅम्पियन बनण्याचा मान मिळविला हे विशेष.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावर गुरुवारी खेळविण्यात आलेल्या निर्णायक लढतीत लोकमतने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा उभारल्या. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज नितीन श्रीवास याने पडझड रोखून धावसंख्येला आकार देत चार चौकार आणि तीन षटकारांसह ५० चेंडूत सर्वाधिक ७२ धावांचे योगदान दिले. सचिन खडके (२६ धावा, ३० चेंडू, ४ चौकार आणि सारंग वळुंजकर(नाबाद १४, १० चेंडू, १ चौकार यांनी नितीनला समर्थ साथ दिली. टीओआयकडून फिरकीपटू राममूर्ती नेरले याने २३ धावात २ तर संदीप दाभेकर, पीयूष पाटील, संदीप वर्धने आणि विनय पांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरात टीओआयने विजयाचा शानदार पाठलाग केला होता. विनय पांडेने ५२ चेंडूत ६७ ,प्रतीक सिद्धार्थने २९ चेंडूत ३० तसेच रूपेश भाईकने १६ चेंडूत २४ धावांचे योगदान देत विजय दृष्टिपथात आणण्याचा प्रयत्न केला. तथापि दडपणातही सचिन खडके याने भेदक मारा करीत लोकमतसाठी विजय खेचून आणला. विनय पांडे बाद होताच सामना फिरला. अखेरच्या षटकात टीओआयला दहा धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर त्यांना चार धावा मिळाल्या, मात्र त्यानंतर सचिनच्या माºयापुढे टीओआयच्या अन्य फलंदाजांनी हाराकिरी करताच लोकमतने विजयावर शिक्कामोर्तब केले. लोकमतकडून सचिन खडके याने २० धावात ३३, तर प्रवीण लोखंडे आणि शरद मिश्रा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पुरस्कार वितरण ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय, स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर, क्षेत्रीय व्यवस्थापक फनिश गुप्ता, एचसीएलचे वित्त व सेवा प्रमुख गौरीशंकर,ज्येष्ठ क्रीडा संघटक अनिल अहिरकर, सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसाळे आणि बीएससी उपाध्यक्ष चंद्रशेखर कारकर यांच्या उपस्थितीत झाले. एसजेएएन अध्यक्ष किशोर बागडे यांनी प्रास्तविक केले. डॉ. राम ठाकूर यांनी संचालन केले व आभार मानले.

Web Title: SJAN Cricket: Lokmat winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत