आठवडाभर आकाश राहणार नीरभ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:12+5:302021-01-20T04:10:12+5:30

नागपुरातील वातावरणात गेल्या २४ तासात बदल जाणवला. कालच्यापेक्षा थंडी कमी होती. तापमानाचा पाराही १५.६ अंश सेल्सिअसवर होता. त्यामुळे दिवसाही ...

The sky will be clear for a week | आठवडाभर आकाश राहणार नीरभ्र

आठवडाभर आकाश राहणार नीरभ्र

Next

नागपुरातील वातावरणात गेल्या २४ तासात बदल जाणवला. कालच्यापेक्षा थंडी कमी होती. तापमानाचा पाराही १५.६ अंश सेल्सिअसवर होता. त्यामुळे दिवसाही म्हणावी तशी थंडी नव्हती. शहरात सकाळी ६६ टक्के आर्द्रतेची नोंद करण्यात आली, तर सायंकाळी ४९ टक्के आर्द्रता होती. दृश्यताही कालच्याएवढीच २ ते ४ किलोमीटर नोंदविल्या गेली.

गोंदियातील किमान तापमानाचा पाराही गेल्या २४ तासात वर चढला. १० अंशावरून तिथे १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात कमाल तापमान ३०.९ ते ३१.१ व किमान तापमान १२.४ ते १२.३ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६५ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: The sky will be clear for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.